नवी दिल्ली : देशात सध्या कोरोना महामारी सुरू आहे . अनेक राज्यात व्हॅक्सीनची टंचाई पाहता 18-44 वयाच्या लोकांना लस देण्याची केंद्र सध्या बंद करण्यात आली आहेत . या दरम्यान वृत्त आहे की , केंद्र सरकार आता दररोज एक कोटी लोकांना व्हॅक्सीन देण्याची योजना बनवत आहे .
सूत्रांनुसार जुलैच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यापासून हे शक्य आहे . सध्या ही योजना अंमलात आणण्यासाठी सरकार दर महिन्याला 30 ते 32 कोटी व्हॅक्सीनचे प्रॉडक्शन करण्यावर विचार करत आहे .येत्या महिन्यात सरकारला कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सीनचे 25 कोटी डोस मिळू शकतात . याशिवाय सरकारचे लक्ष स्पूतनिक व्ही आणि दुसऱ्या व्हॅक्सीनवर सुद्धा आहे . आशा आहे की , येत्या काळात आणखी काही परदेशी व्हॅक्सीनला सुद्धा सरकार हिरवा झेंडा दाखवू शकते . प्रत्येक लसीकरण केंद्रावर दररोज 100 ते 150 लोकांना लस देण्याची योजना आहे . सध्या पाईपलाईनमध्ये सहा कोविड -19 लसी आहेत सीरम इन्स्टीट्यूटची कोव्हॅक्स , बायोलॉजिकल ई ची कॉ.व्हॅक्स , जायडस कॅडिलाची जीकोव्ह - डी , जेनोव्हाची एमआरएनए व्हॅक्सीन , जॉन्सन अँड जॉन्सन व्हॅक्सीनची बायो ई आवृत्ती आणि भारत बायोटेकची इंट्रानॅसल कोविड -19 व्हॅक्सीन . सरकार या वर्षी देशात आरएनए व्हॅक्सीन आणण्यासाठी फायजर सोबत चर्चा करत आहे . भारतीय शास्त्रज्ञ हे संशोधन करत आहेत की , दोन वेगवेगळ्या वॅक्सीनचे मिश्रण कोरोनावर मात करण्यासाठी जास्त परिणामकारक ठरू शकते का . भारतात लवकरच याबाबत टेस्ट केल्या जातील . या प्रयोगात त्या सर्व व्हॅक्सीन सहभागी असतील ज्यांचा वापर सध्या भारतात केला जात आहे . जर हा प्रयोग यशस्वी ठरला तर दोन वेगवेळ्या कंपन्यांचे डोस लोकांना दिले जाऊ शकतात . आगामी काळात कोविशिल्ड व्हॅक्सीनला सिंगल शॉटच ठेवले जावे , यावर चर्चा सुरू आहे . हे जाणून घेण्याचा प्रयत्न आहे की , सिंगल शॉटच व्हायरसशी लढण्यासाठी प्रभावी आहे का . जॉन्सन अँड जॉन्स , स्पूतनिक लाईट आणि कोविशिल्ड व्हॅकसीन एकाच प्रकारच्या प्रक्रियेतून बनल्या आहेत . जॉन्सन अँड जॉन्सन आणि स्पूतनिक लाइट सिंगल डोसचीच व्हॅक्सीन आहे .


0 Comments