देशात कोरोनाचा उद्रेक सुरू असताना काही अश्या घटना घडत असतात की ज्यामुळे समाजमन सुन्न होऊन जाते . समाज मन सुन्न करणारी अशीच एक घटना पश्चिम बंगाल मधील बर्दवान मध्ये घडली आहे . येथे एका अल्पवयीन प्रियकराने आत्महत्या केल्यावर लोकांनी तिचा विवाह त्याच्या मृतदेहा बरोबर लावून दिला आहे .
या घटनेचा व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे . पोलिसांना या बद्दल माहिती मिळाल्यावर पोलिसांनी प्रकरणाचा तपास सुरू केला . मिळालेल्या माहितीनुसार , अल्पवयीन मुलगा आणि त्याची प्रेयसी यांचे धर्म वेगवेगळे होते.दोघांचेही नातेवाईक त्यांच्या लग्नासाठी तयार होते . मात्र , मुलगा अल्पवयीन असल्याने मुलीची आई या लग्नासाठी तयार नव्हती . याच कारणावरुन मुलगा आणि मुलीमध्ये वाद झाला आणि यातूनच मुलानं आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं . आत्महत्या आत्महत्या करत असल्याचं सांगिचलं होतं . यानंतर त्यानं व्हॉट्सअॅपवर प्रेयसीला आपला फोटो देखील पाठवला आणि आत्महत्या केली . घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले . पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे . शवविच्छेदनानंतर या मुलाचा मृतदेह गावात आणण्यात आला आणि पुन्हा एकदा वाद सुरू झाला . मिळालेल्या माहितीनुसार , स्थानिकांनी याप्रकरणी मुलगी आणि तिच्या आईला जबाबदार धरत दोघींना बेदम मारहाण केली . यानंतर दोघीलाही जबरदस्ती मुलाच्या मृतदेहाजवळ आणण्यात आलं . यानंतर मुलाच्या मृतदेहाकडून मुलीच्या भांगेत कुंकू भरण्यात आलं . शहरातील कांटापुकूर परिसरात हा मुलगा राहत होता . मृताच्या शेजाऱ्यांनी या मुलीला याची कल्पना होती , की मुलगा आत्महत्या करत आहे असं म्हटलं आहे .मुलीकडे त्याच्या आईचा फोन नंबरही होता . मात्र , तरीही तिने याबाबत मुलाच्या कुटुंबीयांनी याबाबत माहिती दिली नाही . वेळेवर मुलाच्या घरच्यांना याबाबत माहिती दिल्यास त्याला वाचवता आलं असतं , असं त्यांनी म्हटलं आहे . पोलीस सध्या या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत . पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मारहाण आणि अल्पवयीन मुलीसोबत छेडछाड केल्याची तक्रार मुलीच्या आईनंही पोलीस ठाण्यात दाखल केली आहे . आरोपींविरोधात कारवाई केली जाईल असं म्हटलं आहे . एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे .


0 Comments