सांगोला तालुक्यात नोव्हेंबर २०२० मधिल (PMGKAY) रेशनच्या मोफत धान्याचा काळाबाजार ? ; विभागीय उप आयुक्तांचे चौकशी करून अहवाल सादर करण्याचे दिले आदेश !
सांगोला/ प्रतिनिधी ; कोरोनाच्या पहिल्या लाटेत गोरगरीब नागरिकांची उपासमार होऊ नये म्हणून संपूर्ण देशासह सांगोला तालुक्यातील अन्न सुरक्षा योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना अंतर्गत काही महिने प्रति व्यक्ती ५ किलो मोफत धान्य वाटप करण्यात आले होते.
परंतु नोव्हेंबर २०२० या महिन्याचे मोफत धान्य तालुक्यातील काही दुकानदारांनाच वाटपासाठी मोफत धान्य उपलब्ध झाले होते. तालुक्यातील शेकडो रेशन दुकानदार यांना रेशनकार्डधारकांना वाटप करण्यासाठी रेशनचे मोफत धान्य उपलब्ध न झाल्याने तालुक्यातील हजारों रेशनकार्ड धारक धान्य वाटपाविना वंचित राहिलेले आहेत.त्यामुळे नोव्हेंबर २०२० या महिन्यातील मोफत धान्य तालुक्यातील हजारों रेशनकार्ड धारकांना का ? वाटप करण्यात आले नाही. या या मोफत धान्याचा काळाबाजार तर झाला नाही ? ना या बाबत चौकशी करण्याची मागणी भाजपचे वि.जा.भ.ज.सेलचे ता.अध्यक्ष
श्री. उमेश मंडले यांनी केली होती. त्यानुसार विभागीय उपाआयुक्त पुरवठा पुणे विभाग पुणे यांनी सदर सांगोला तालुक्यातील प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेच्या धान्याची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले असल्याची माहिती उमेश मंडले यांनी दिली आहे.



0 Comments