google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सुनेनं केला सासूचा खून, पत्नीला वाचविण्यासाठी लेकानं केलं असं काही

Breaking News

सुनेनं केला सासूचा खून, पत्नीला वाचविण्यासाठी लेकानं केलं असं काही

 सुनेनं केला सासूचा खून, पत्नीला वाचविण्यासाठी लेकानं केलं असं काही

राग अनावर झाल्याने सुनेने सासुचा ब्लाऊजच्या सहाय्याने गळा आवळून खून केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. हा प्रकार तळेगाव शहरातील टेल्को हाऊसिंग सोसायटीत घडली आहे. सासू-सुनेच्या भांडणातून सुनेने हे टोकाचे पाऊल उचलले असून यामध्ये पतीचाही सहभाग आहे. बेबी शिंदे असे खून झालेल्या सासूचे नाव असून पूजा शिंदे (सून), मिलिंद शिंदे (पती) असे आरोपीची नावे आहेत.या बाबत सविस्तर वृत्त असे की, शुक्रवारी सकाळी पूजा आणि सासू बेबी शिंदे या दोघींमध्ये कडाक्याचे भांडण झाले. त्यानंतर पूजाला राग अनावर झाल्याने घरातील कापडी ब्लाउजच्या साह्याने तिने आपल्या सासूचा गळा आवळून खून केला.हा सर्वप्रकार आपला पती मिलिंद यास सांगितला दोघांनी संगणमत करून मृतदेह एका प्लास्टिकच्या पोत्यात भरला आणि मृतदेह घराच्या छतावर एका कोपऱ्यात ठेवला. मात्र मृतदेह कुजू लागल्याने त्याची दुर्गंधी इतरत्र पसरू लागल्याने आपण केलेला गुन्हा उघडकीस येईल या भीतीपाई पती व पत्नीने मिळून मृतदेह उचलून जवळच असलेल्या एका निर्जन ठिकाणी झाडा झुडपात फेकून दिला. परंतु पोत्या मधून येणाऱ्या दुर्गंधीने टेल्को कॉलनी येथील रहिवाशांचा संशय बळावला, त्यांनी ही घटना पोलिसांना कळविली.मृतदेहाची ओळख पटवल्यानंतर तळेगाव पोलिसांनी चौकशीसाठी मयत महिलेची सून पूजा शिंदे हिला ताब्यात घेतले. सुरुवातील तिने उडवाउडवीची उत्तर दिली, पण सासूच्या भांडणाला आणि त्रासाला कंटाळून तिने हे टोकाचे पाऊल उचलल्याची कबुली पोलिसांना दिली. या संपूर्ण प्रकरणात पती मिलिंद याचा ही सहभाग असल्याचे पूजाने पोलिसांना सांगितले. पोलिसांनी दोघांनाही अटक केली असून या प्रकरणी अमित शिंदे याने तळेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे

Post a Comment

0 Comments