google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 अहो आश्चर्यम् ! कोंबडीच्या पिल्लाला चक्क चार पाय

Breaking News

अहो आश्चर्यम् ! कोंबडीच्या पिल्लाला चक्क चार पाय

 नंदेश्वर | बाळासाहेब सासणे ऐकावे ते नवल अन् पहावे ते आश्चर्य , अशीच एक घटना मंगळवेढा तालुक्यातील खडकी येथे घडली आहे . चार पायाचे कोंबडीचे पिल्लू जन्माला आल्याने परिसरात तो कुतूहलाचा विषय बनला आहे .


कोंबडीच्या इतर पिल्लांबरोबर इकडून - तिकडे पाळणारे हे चार पायाचे पिल्लू सर्वांचे लक्ष वेधून घेत असून अनुवांशिक दोषामुळे घडलेला हा दुर्मिळातील दुर्मिळ प्रकार असल्याचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.गोविंद राठोड यांनी सांगितले . याबाबतची माहिती अशी की , खडकी येथील पद्मिनी रामचंद्र रणदिवे यांच्याकडे अनेक गावरान कोंबड्या असून तीन आठवड्यांपूर्वी त्यांनी घरच्या कोंबडीची २० अंडी खुडूक कोंबडीखाली उबवत ठेवलेली होती . कालपासून त्यातून पिल्लं बाहेर येण्यास सुरुवात झाली . आज सकाळी एका अंड्यातून चक्क चार पायाचे पिल्लू जन्माला आल्याचे पाहून रणदिवे कुटुंबियांना आश्चर्याचा धक्काच बसला . ही बातमी गावात वाऱ्यासारखी पसरताच चार पायाचे कोंबडीचे पिल्लू बघायला कुतूहलापोटी ग्रामस्थांनी गर्दी केली . पिल्लाला पुढे दोन व पाठीमागे दोन पाय असून चारही पाय मजबूत आहेत . इतर पिल्लाबरोबर हेही पिल्लू दुडूड्डू धावत आहे . दरम्यान , अनुवांशिक दोषातून हा प्रकार घडला असून ती एक दुर्मिळातील दुर्मिळ घटना आहे . चारही पाय सुस्थितीत असले आणि पिल्लू व्यवस्थित चालून - फिरून असेल तर ते जगून मोठेही होऊ शकते . यापूर्वीही काही ठिकाणी अशा घटना घडलेल्या असल्याचे पशुसंवर्धन अधिकाऱ्यांनी सांगितले .

Post a Comment

0 Comments