google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सोनू…तुझ्यावर कुणाचाच भरोसा नाय, 13 लग्न, 13 मुलांना लुटलं, सोनू शिंदेची टोळी अखेर सापडली!

Breaking News

सोनू…तुझ्यावर कुणाचाच भरोसा नाय, 13 लग्न, 13 मुलांना लुटलं, सोनू शिंदेची टोळी अखेर सापडली!

 सोनू…तुझ्यावर कुणाचाच भरोसा नाय, 13 लग्न, 13 मुलांना लुटलं, सोनू शिंदेची टोळी अखेर सापडली!


नंदुरबार, दि.२३ मे: ‘सोनू, तुझा माझ्यावर भरोसा नाय का?’, हे गाणं आपण सगळ्यांनी ऐकलंय. या गाण्याच्या आशयानुसार हे गाणं एखाद्या प्रेमी युगुलावर आधारीत आहे, असं लगेच कळतं. खरंतर हे गाणं थोडं विनोदी आहे. पण महाराष्ट्रभरात घरोघरी पोहोचलंय. या गाण्याशी संबंधित अनेक व्हिडीओ व्हायरलही झाले. बरं ते जाऊद्या, या गाण्याचे गोडवे गाण्यात मुख्य बातमी राहिली. तर खान्देशात एका सोनू शिंदे नावाच्या तरुणीला अटक करण्यात पोलिसांना यश आलंय. या सोनूने तब्बल 13 मुलांना फसवलं. तेराही जणांशी लग्न केलं. त्यानंतर त्यांना चिक्कार लुटलं. नंतर पळून गेली. विशेष म्हणजे ती एकटी नाही तर तिच्यापाठीमागे एक मोठी टोळीच असल्याचं समोर आलं आहे.नेमकं प्रकरण काय?सोनू शिंदे ही टोळी खरंतर हिंगोली आणि अकोला येथील असल्याची माहिती पोलिसांच्या तपासात समोर आली आहे. वेगवेगळ्या तरुणांसोबत लग्न जुळवण्यासाठी ही टोळी विविध शहरांमधील दलालांची मदत घ्यायची. यावेळी तिने नंदुरबारात एका कुटुंबाला फसवलं तेव्हा तिला या कामात औरंगाबादच्या एका दलालाने मदत केल्याचं उघड झालं आहे. हा सगळा प्रकार नेमका कसा उघड झाला, ही टोळी नेमकी कशी पकडली गेली, याबाबतची सविस्तर माहिती आज आम्ही तुम्हाला देणार आहोत.नंदुरबारच्या एका कुटुंबाला फसवलं सोनू शिंदे या तरुणीने दोन आठवड्यांपूर्वी नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातल्या मंदाने येथील एका तरुणाशी लग्न केलं. लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्त्वाचा क्षण असतो. लग्नाच्या आठवणी आयुष्यभर जोपासल्या जातात. त्यामुळे साहजिकच नवरदेव आनंदात होता. लग्नासाठी वधू पक्षाकडून काही लाखांची मागणी झाली होती. मुलाच्या कुटुंबियांनी वधू पक्षाला पैसेही दिले. पण लग्नानंतर सत्यानाश झाला. नवी नवरी नांदलीच नाही. ती पळून गेली.सोनू शिंदे टोळी विरोधात पोलिसात तक्रारघरात आलेली नवी नवरी अचानक पळून गेल्यानंतर संबंधित कुटुंबाला मोठा झटका बसला. आपण लुबाडलो गेलो याची त्यांना जाणीव झाली. त्यांनी तातडीने पोलिसात तक्रार केली. पोलिसांनी संबंधित घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने याप्रकरणी गुन्हा दाखल करत तपासाला सुरुवात केली.पोलिसांनी तपास कसा केला पोलिसांचा तपास सुरु असतानाच त्यांना एक महत्त्वपूर्ण माहिती मिळाली. पोलिसांना सोनू शिंदे आता शिंदखेडा तालुक्यातील एका तरुणाशी 13 वं लग्न करणार असल्याची माहिती मिळाली. पोलीस आपला तपास करत असल्याचा सुगाला या टोळीला लागला. त्यांनी थेट लग्नाचं ठिकाणच बदललं. लग्न नंतर अमळनेर तालुकत्यातील ग्रामीण भागात ठरवण्यात आलं. पण कानून के हाथ लंबे होते, अशा म्हणीप्रमाणे पोलिसांना त्याबाबत माहिती मिळालीच.पोलिसांकडून भर मंडपात वधू सोनूला अटक पोलिसांनी अगदीच वेळेवर म्हणजे लग्न लागणार होतंच त्याआधीच लग्न मंडपातून सोनू शिंदे टोळीला जेरबंद केलं. पोलिसांच्या कारवाईचा सुगावा लागताच नवरीची आई आणि भाऊ पळून जाण्यात यशस्वी ठरले. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. पण वधू सोनू पकडली गेलीय. पोलिसांच्या या कारवाईला थोडा जरी वेळ झाला असता तर आणखी एक कुटुंब सोनू शिंदे टोळीच्या जाळ्यात अडकलं असतं. या टोळीने खान्देशातील धुळे, नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यातील अनेकांकडून लग्न लावून पैसे उकळल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे भविष्यातील अनेकांची फसवणूक टळली आहे.

Post a Comment

0 Comments