सांगोला , दि . २७ ( प्रतिनिधी ) सांगोला तालुक्यात डेडिकेटेड कोव्हिड होस्पिटल करण्यासाठी निधी मंजूर करून तब्बल दीड महिना झाला तरी कोव्हीड हॉस्पिटल सुरू झाले नाही याबाबत काल दिनांक २७ में रोजी दुपारी तीन वाजता ग्रामीण रुग्णालय येथे डेडिकेटेड कोव्हीड हॉस्पिटल कामाची पाहणी करून आ . शहाजीबापू पाटील यांनी आढावा घेतला .
वाढत्या कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव पाहता तालुक्यांमध्ये रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्यामुळे सांगोला तालुक्यांमध्ये गरीब रुगणासाठी कोव्हीड हॉस्पिटल सुरू करावे , अशी जनतेची मागणी होत होती या मागणीची दखल घेऊन आ . शहाजीबापू पाटील यांनी सांगोला तालुक्यासाठी ग्रामीण रुग्णालय सांगोला येथे व प्राथमिक आरोग्य केंद्र मेडशिंगी येथे कोव्हीड होस्पिटल चालू करण्याच्या संदर्भात बैठक घेऊन अधिकाऱ्यांना सूचना दिल्या होत्या व आ , शहाजीबापू पाटील यांनी आमदार निधीतून एक कोटीचा निधी याहॉस्पिटलला देण्याचे जाहीर केले होते . त्याप्रमाणे मेडशिंगी प्राथमिक केंद्रासाठी ४० लव सांगोला ग्रामीण रुग्णालयासाठी ४० ला विविध आरोग्य साहित्यासाठी मंजूर झाले आहेत गोरगरीब रुग्णांवर या हॉस्पिटलमध्ये मोफत उपचार होणार आहेत . येणान्या दोन - तीन ऑक्सीजन लाईन टाकण्याची काम पूर्ण करून एक जूनला हे हॉस्पिटल गोरगरीब रुग्णांच्या सेवेकरिता चालू करावे असे सांगून सदर बैठकीमध्ये रुग्णालयातील विविध अडचणी समजून घेतल्या . लसीकरण व कोरोना चाचणीसंदर्भात प्रशासनानी योग्य नियोजन करावे , नागरिकांची गैरसोय होणार नाही , या संदर्भात प्रत्यक्षपणे अधिकान्यांनी लक्ष घालावे अश्याही सूचना यावेळी आ . शहाजीबापू पाटील यांनी अधिकान्यांना केल्या . या बैठकीसाठी उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले , तहसीलदार अभिजित पाटील , गटविकास अधिकारी संतोष राऊत , मख्याधिकारी कैलास केंद्रे.तालका आरोग्याधिकारी डॉ . सीमा दोडम नी , प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ . उत्तम फुले , सार्वजनिक बांधकाम उपअभियंता अशोक मलगीर डॉ शिवराज भोसले , डॉ . पियुष साळुखे , डॉ . मकरंद येलपले , डॉ गावडे यांच्यासह माजी नगराध्या रफिक नदाफ उपस्थित होते .


0 Comments