जिल्हाधिकाऱ्यांना अजितदादांच्या बैठकीची धास्ती ! पहाटेपर्यंत जागून तयार केला कोरोना रिपोर्ट काही दिवसांपूर्वी अजित पवारांनी एका बैठकीत " जो अधिकारी काम करीत नाही , पदाधिकाऱ्यांचे ऐकत नाही अशांचा ठराव करून आम्हाला पाठवा ;
त्यांची तत्काळ बदली करतो ' , असे स्पष्टपणे सांगितले होते .सोलापूर : शहरातील कोरोना ( Covid - 19 ) कमी होत असतानाच ग्रामीणमध्ये कोरोना रुग्णांबरोबरच मृत्यूदरही चिंताजनक बनत चालला आहे . या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी ( ता . 25 ) संबंधित जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांशी सकाळी नऊ वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधून कारणांचा शोध घेतला . तत्पूर्वी , या बैठकीची तयारी करण्यासाठी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर पहाटे दोन वाजेपर्यंत जागे राहिले आणि त्यांनी या बैठकीचा अहवाल तयार केल्याची माहिती सूत्रांनी दिली रोखठोक , दणकेबाज बोलणे आणि धडक कारवाईत पटाईत असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा वरिष्ठ अधिकाऱ्यांसह प्रशासनावर दरारा आहे . काही दिवसांपूर्वी त्यांनी बैठकीत महापालिकेच्या महापौर श्रीकांचना यन्नम , जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर , आयुक्त पी . शिवशंकर यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांशी संवाद साधला . त्या वेळी त्यांनी जो अधिकारी काम करीत नाही , पदाधिकाऱ्यांचे ऐकत नाही अशांचा ठराव करून आम्हाला पाठवा ; त्यांची तत्काळ बदली करतो , असे स्पष्टपणे सांगितले होते . त्यानुसार महापौरांनी आयुक्त पी . शिवशंकर यांची बदली करण्याची मागणी त्यांच्याकडे केली . या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी अजित पवारांच्या बैठकीची धास्ती घेतली होती , अशी चर्चा आहे . बैठकीपूर्वी जिल्हाधिकाऱ्यांनी आरोग्य विभागातील बऱ्याच अधिकाऱ्यांना सोबत घेऊन मृत्यूदर व रुग्णवाढीची माहिती संकलित करून त्याच्या कारणांची यादी बनविली . पहाटे दोन वाजता त्या अधिकाऱ्यांना सोडले आणि जिल्हाधिकारी घरी गेले , असेही सूत्रांनी सांगितले . Also Read : जिल्ह्यातील " या ' 137 गावांनी उडवली प्रशासनाची झोप ! तुम्ही काहीही मागितलं तर देईन , पण कोरोना आटोक्यात आणा कोरोना रुग्णांची संख्या कमी न झालेल्या जिल्ह्यांमध्ये सोलापूरचाही समावेश आहे . शहरातील रुग्णसंख्या कमी झाली , परंतु मृत्यूदर अजूनही चिंताजनकच आहे . दुसरीकडे , ग्रामीण भागात रुग्णांबरोबरच मृत्यूदरही लक्षणीय आहे . या पार्श्वभूमीवर बैठकीदरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले , उपाययोजनांसाठी अधिकाऱ्यांना जे हवे आहे ते देईन , पण काहीही करून मृत्यूदर व रुग्णसंख्या आटोक्यात आणा . आता पुढे काही दिवसांत पुन्हा आढावा बैठक होणार आहे . तत्पूर्वी , रुग्ण व मृत्यूदर कमी करण्याचे आव्हान जिल्हा प्रशासनासमोर आहे .


0 Comments