google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सोलापूरच्या ग्रामीण भागात कोरोना बाधितांचा आकडा कमी होताना दिसत नाही; जिल्हाधिकाऱ्यांनी पोलीस प्रशासनाला दिले ‘हे’ आदेश

Breaking News

सोलापूरच्या ग्रामीण भागात कोरोना बाधितांचा आकडा कमी होताना दिसत नाही; जिल्हाधिकाऱ्यांनी पोलीस प्रशासनाला दिले ‘हे’ आदेश

 सोलापूरच्या ग्रामीण भागात कोरोना बाधितांचा आकडा कमी होताना दिसत नाही; जिल्हाधिकाऱ्यांनी पोलीस प्रशासनाला दिले ‘हे’ आदेश


सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील कोरोना रुग्णांची संख्या कमी करण्यासाठी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी पोलीस प्रशासनाला कडक कारवाईचे निर्देश दिले आहेत.ग्रामीण भागात कोरोना बाधितांचा आकडा कमी होताना दिसत नाही. त्यामुळे ग्रामीण भागात विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई करण्याकरिता चाळीस पोलीस पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे.या गस्ती पथकाला विशेष वाहने देखील दिली आहेत. यासोबत ग्रामीण भागात होम आयसोलेशन पूर्णता बंद करण्यात आली आहे. घरीच उपचार घेणाऱ्या कोरोना रुग्णांचा शोध आणि माहिती गोळा करण्याचे काम गस्ती पथकाद्वारेही होणार आहे , अशी माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली आहे.जिल्ह्यात जवळपास चार हजार रुग्ण होम आयसोलेशनतंर्गत उपचार घेत होते. यापुढे होम आयसोलेशन पूर्णता बंद करण्यात येणार आहे. जिल्ह्यात एक वैद्यकीय महाविद्यालय , ३ उपजिल्हा रूग्णालये , १४ ग्रामीण रूग्णालये , ७७ प्राथमिक आरोग्य केंद्र आणि याअंतर्गत ४३१ उपकेंद्र रूग्णांना सेवा देत आहेत.याचबरोबर १४ नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र आणि सहा आयुर्वेदिक दवाखाने आहेत. ग्रामीण भागात ७७ प्राथमिक आरोग्य केंद्रांसोबत अन्य ३३ ठिकाणी नव्याने कोविड केअर सेंटर उभारण्यात येणार असून ६० ठिकाणी ती कार्यरत झाली आहेत. प्रत्येक कोविड केअर सेंटरमध्ये २५ ते ५० बेडची सुविधा निर्माण करण्यात आली आहे .जनआरोग्यातून ६ हजार लोकांवर उपचार महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत आतापर्यंत जिल्ह्यात ५ हजार ९ ६० कोरोना रुग्णांनी उपचारघेतला आहे.कोरोना बधितांवर मोफत उपचार व्हावे.यासाठी राज्य सरकारने कोरोनाचा समावेश महात्मा फुले जनआरोग्य योजनेत केला होता. या योजनेतून जिल्ह्यात ५ हजार ९६० कोरोनाबधितांनी उपचार घेतला आहे .२६ कोटीचाअनुदान संबंधित रुग्णालयांना प्राप्त झाला आहे.या योजनेअंतर्गत ४४ रूग्णालयात एकूण ५६० बेड राखीव आहेत . योजनेच्या नियमानुसार कोरोना उपचार केंद्रात २५ टक्के बेड हे राखीव आहेत. अशी माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली.तालुकानिहाय कोविड केअर सेंटर मंगळवेढा : ०३ , अक्कलकोट : ०६ , बार्शी : ०५ , करमाळा : ०५ , माढा : ० ९ , मोहोळ : ०८ , माळशिरस : १ ९ , पंढरपूर : २१ , सांगोला : १० , दक्षिण सोलापूर : ० ९ आणि उत्तर सोलापूर : ०५ .

Post a Comment

0 Comments