लक्ष्मीनगरमध्ये विवाहितेची आत्महत्या सांगोला : पित्याने काही वेळेपूर्वी सासरी सोडलेल्या मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार मंगळवार दुपारी दीडच्या सुमारास लक्ष्मीनगर ( ता. सांगोला जि.सोलापूर)
सांगोला : पित्याने काही वेळेपूर्वी सासरी सोडलेल्या मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार मंगळवार दुपारी दीडच्या सुमारास लक्ष्मीनगर ( ता . सांगोला ) येथील विठ्ठल मंदिराजवळ घडला . तिच्या आत्महत्येचे वृत्त समजताच नातेवाइकांचा अणूंचा बांध फुटला . राधिका दऱ्याप्पा गोडसे ( वय १८ ) असे विवाहितेचे नाव असून , या घटनेनंतर संतापलेल्या मुलीच्या नातेवाइकांनी नवऱ्या मुलाच्या घरासमोर गोंधळ घातला . घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक संदेश नाळे , पोलीस कॉन्स्टेबल हजरत पठाण , पोलीस कॉन्स्टेबल बापू झोळ यांनी वेळीच हस्तक्षेप करीत गोंधळावर नियंत्रण आणले . पोलिसांनी पती दाप्पा मोहन गोडसे व सासू शारदा मोहन गोडसे या दोघांना ताब्यात घेतले आहे . इटकी येथील बिटू बाळू करचे यांची मुलगी राधिका हिचा विवाह नऊ महिन्यांपूर्वी लक्ष्मीनगर येथील दऱ्याप्पा मोहन गोडसे यांच्या समवेत झाला होता . दरम्यान , ८ दिवसांपूर्वी राधिका ही जागरण - गोंधळाच्या कार्यक्रमासाठी माहेरी इटकीला गेली होती . मंगळवारी दुपारी १२ च्या सुमारास बिटू करचे यांनी राधिकाला सासरी लक्ष्मीनगर येथे घरी आणून सोडले . त्यांनी तेथे पाहुणचार घेऊन परत इटकी गावी परतले . दरम्यान , सासू शारदा गोडसे कामानिमित्त बाहेर गेली होती , तर पती दऱ्याप्पा पोहायला गेला होता . हीच संधी साधून राधिकाने घराच्या दोन्ही खोल्यांना आतून कडी लावून बंद केल्या . साडीने पत्र्याच्या लोखंडी अँगलला गळफास घेतला . काही वेळाने पती दयप्पा यांनी घरी येऊन घराचा दरवाजा वाजविला असता आतून काहीच प्रतिसाद मिळाला नाही . त्यांनी खिडकीतून आत डोकावले असता पत्नी राधिका हिने गळफास घेतल्याचे दिसून आले . त्यानंतर या घटनेची माहिती पोलीस पाटील सोमनाथ नरळे यांना दिली .


0 Comments