सांगोला उपसा सिंचन योजनेचे सर्वेक्षण सुरु होणार आमदार- शहाजीबापू पाटील यांची मुख्य अभियंत्या सोबत बैठक संपन्न
सांगोला /प्रतिनिधी.सांगोला तालुक्यासाठी मंजूर असलेले उजनीचे दोन टीएमसी पाणी सांगोला उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून तालुक्यातील २२गावांना देण्याच्या कामाला सन २०००साली प्रशासकीय मान्यता मिळाली होती. परंतु आजपर्यत या कामाला सुरुवात झाली नसल्याने व सदरची प्रशासकीय मान्यता रद्द झाल्याने या योजनेचे भविष्य अंधारात होते.आमदार शहाजीबापू पाटील यांनी आमदार झाल्यापासूनच या योजनेला मान्यता मिळविण्यासाठी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्याकडे पत्र देऊन व समक्ष भेटून पाठपुरावा केला होता. या पत्रावर मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी या योजनेचे सर्व्हेक्षण करून प्रस्ताव त्वरीत सादर करण्याचे आदेश दिले आहेत.यामुळेच परवा मंगळवारी पुणे येथील कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या कार्यालयामध्ये कृष्णा खोरे विकास महामंडळाचे मुख्य अभियंता व्ही. जी. रजपूत यांनी आमदार शहाजीबापू पाटील यांना या योजनेच्या आराखड्याबाबत सूचना करण्यासाठी आमंत्रित केले होते या बैठकीमध्ये आमदार शहाजीबापू पाटील यांनी सांगोला तालुक्यातील इतर कोणत्याही योजनेमध्ये समाविष्ट नसलेल्या अचकदाणी, बागलवाडी, सोनलवाडी, नवी लोटेवाडी, जुनी लोटेवाडी, अजनाळे, खवासपूर, कटफळ, इटकी,यलमर मंगेवाडी लक्ष्मीनगर,चिकमहूद या १२ गावांचा समावेश करून उर्वरित पाणी २२गावातील शेतकऱ्यांना देण्याची तरतूद करण्याची सुचना दिली यावर मुख्यअभियंता व्ही. जी. रजपूत यांनी योजनेच्या सर्वेक्षणासाठी दोन कोटी रुपयांच्या निधीची त्वरीत तरतूद केली असून सर्वेक्षणाची निविदा प्रसिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत येत्या २ते ३ महिन्यांमध्ये या योजनेचे संपूर्ण सर्वेक्षण होऊन आराखडा अंतीम केला जाणार आहे यामुळे या योजनेला सुधारीत प्रशासकीय मान्यता मिळून योजनेला शासनाकडून मंजुरी मिळण्याची कार्यवाही सुरु झाली आहे.निवडणुकीमध्ये दिलेल्या आश्वासनानुसार सांगोला तालुक्यातील एकही गाव पाण्यावाचून वंचित रहाणार नाही या साठी मी कार्यरत आहे व सांगोला तालुक्याच्या हक्काचे दोन टीएमसी उजनीचे पाणी शेतकऱ्यांना दिल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही असे आमदार शहाजीबापू पाटील यांनी सांगितले. या बैठकीस कृष्णा खोरे विकास महामंडळाचे मुख्यअभियंता व्ही जी रजपूत,अधिक्षक अभियंता प्रवीण कोल्हे, कार्यकारी अभियंता नारायण जोशी, उप अभियंता ए के सुरनीस,यांच्यासह माजी नगराध्यक्ष रफिक नदाफ उपस्थित होते.


0 Comments