सोलापूर जिल्ह्यातील खासगी दवाखान्यांनी जादा घेतलेले ३५ लाख परत करण्याचे आदेश
कोरोनाग्रस्तांना दिलासा : १० तालुक्यांतील ५ हजार ६३३ बिलांची झाली तपासणी सोलापूर : ग्रामीण भागातील दहा तालुक्यांत खासगी कोविड हॉस्पिटलमध्ये उपचार घेणाऱ्या ५ हजार ६३३ बिलांची तपासणी करण्यात आल्यावर संबंधित हॉस्पिटलनी ३५ लाख ५१ हजारांचे जादा बिल आकारल्याचे लेखा परीक्षणातून उघड झाले आहे . संबंधित हॉस्पिटलनी जादा आकारलेले बिल रुग्णांना परत करावेत , असे आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिले आहेत . जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने अनेकांना हैराण केले . कोरोना उपचारासाठी ९ २ हॉस्पिटलमध्ये सोय करण्यात आली . यात जवळपास ७० हॉस्पिटल खासगी आहेत . कोरोनाची लागण झालेल्या अनेकांनी सरकारी हॉस्पिटलमध्ये बेड न मिळाल्याने खासगी हॉस्पिटलचा रस्ता धरला , तर काही जणांनी चांगली सविधा मिळते म्हणून स्वत : हून खासगी रुग्णालयात उपचार घेतले . गरिबांना मात्र खासगी रुग्णालयात उपचार घेणे महागात पडले आहे . अनेकांनी नाइलाजाने दागिने मोडून , सावकाराकडून कर्ज घेऊन दवाखान्याचे बिल भरल्याचे दिसून आले आहे . कोविड सेंटर चालविणाऱ्या हॉस्पिटल प्रशासनाकडून मात्र रुग्णांना कोणतीच दया दाखवली नसल्याचे दिसून येत आहे . याउलट अनेकांनी रुग्णांकडून अव्वाच्या सव्वा बिल उकळल्याचे दिसून आले आहे . कोरोनाकाळात खासगी कोविड हॉस्पिटलकडून रुग्णांची पिळवणूक होऊन नये म्हणून जिल्हाधिकारी शंभरकर यांनी तहसीलमार्फत प्रत्येक तालुक्यास लेखा परीक्षकांची नियुक्ती केली आहे . जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्य लेखा रीक्षक अजय पवार यांकडून ९ | तालुक्यातील खासगी रुग्णालयांच्या बिलाच्या तपासणीबाबत आढावा घेतला जात आहे . २३ मेपर्यंत दहा तालुक्यांतील लेखा परीक्षकांनी ५ हजार ६३३ बिलांची तपासणी केली आहे . यामध्ये दवाखान्यांनी ३५ लाख १४ हजार २७३ रुपये जादा बिल लावल्याचे आढळून आले आहे . ज्या रुग्णालयांनी हे जादा बिल वसूल केले आहे , त्यांनी संबंधित रुग्णांना हे बिल परत करावे , असे आदेश देण्यात आले आहेत . लेखा परीक्षकांच्या तपासणीमुळे दवाखान्याची लबाडी समोर आली आहे . कोरोनाकाळात कोविड सेवा देणाऱ्या हॉस्पिटलनी शासनाने ठरवून दिलेल्या नियमाप्रमाणे बिल आकारणी करणे अपेक्षित आहे , असे असताना अनेकांनी रुग्णांना अव्वाच्या सव्वा बिल आकारून सेवेत पाप केल्याचे समोर आले आहे . ST अक्कलकोट तालुक्यात शून्य जिल्ह्यातील अकरा तालुक्यांपैकी अक्कलकोट तालुक्यात एकही खासगी कोविड हॉस्पिटल कार्यरत नसल्याचे दिसून येत आहे . त्यामुळे या तालुक्यातील शून्य बिलाची तपासणी झाली . बार्शी तालुक्यात संसर्ग जास्त आहे व या ठिकाणी खासगी दवाखानेही जास्त आहेत . बार्शीत १ हजार ८२८ बिलांची तपासणी होऊन १ ९ लाख १२ हजार परत करण्याचे आदेश झाले आहेत . माळशिरसमध्ये १ हजार २६ बिलांची तपासणी होऊन ३ लाख ६१ हजार , पंढरपूरमध्ये ७०२ बिलांची तपासणी होऊन ९ लाख ६० हजार रुपये परत करण्याचे आदेश देण्यात आले आहेत .बिलाबाबत काय आहे नियम खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेणाऱ्या कोरोना रुग्णांसाठी बिल आकारण्यास सरकारने तीन टप्पे केले आहेत . जनरल वॉर्ड : ४ हजार , ऑक्सिजन : ७ हजार ५०० , व्हेंटिलेटर : ९ हजार , त्याचबरोबर जनरल वॉर्ड पीपीई किटसाठी ६०० रुपये , ऑक्सिजन वॉर्ड : १ हजार , आयसीयू : १२०० रुपये . असे असताना जनरलमध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांना ऑक्सिजन लावल्याचे दाखवून तसेच पीपीई किटचा जादा चार्ज लावल्याचे दिसून आल्याचे पंढरपूरचे लेखा परीक्षक सदावर्ते यांनी सांगितले .


0 Comments