शेतात जाणाऱ्या महिलेला रस्त्यात गाठून बलात्कार
त्या घटनेचे चित्रीकरण व्हायरल करण्याची धमकी देत आणखी एका कडून बलात्कार
आर्णी / यवतमाळ – शेतात एकट्या जाणाऱ्या महिलेला रस्त्यात गाठून तिच्यावर बलात्कार करून त्याचे चित्रीकरण करून ते सोशल मिडियावर व्हायरल करण्याची धमकी देत एका अल्पवयीन आरोपीने तिच्यावर बलात्कार केला. यानंतर तिसऱ्या आरोपीने सोशल मिडियावर ती क्लिप व्हायरल केली. महिलेच्या लक्षात हा प्रकार आल्यावर तिने पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तिघांपैकी एका आरोपीला अटक केली आहेपोलीस सूत्रांनी दिलेल्य माहिती नुसार पिडीत महिला ही 6 मे रोजी दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास डेहणी शेत शिवारातील एका शेतातून जात होती. त्यावेळी आरोपी अमोल प्रल्हाद आठवले (वय 39) याने पाठलाग करुन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे.व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन बलात्कार घटनास्थळी हजर असलेले आरोपी आकीब खान वाजिद खान (वय 20) आणि 17 वर्षीय आरोपीने बलात्काराचा व्हिडीओ आपल्या मोबाईलमध्ये शूट केला. हा व्हिडीओ अल्पवयीन आरोपीने पीडितेला दाखवला. अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन त्यानेही महिलेवर बलात्कार केला. तोंड उघडल्यास अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची पुन्हा धमकी दिली.त्यानंतर आरोपी आकीब खान वाजिद खानने 24 मे रोजी हा व्हिडीओ व्हायरल केला, असा आरोप पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीत केला आहे. पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा दाखल केला असून अमोल प्रल्हाद आठवले याला पोलिसांनी अटक केले आहे. या घटनेचा तपास ठाणेदार पितांबर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करत आहेत.


0 Comments