सांगोला तालुक्यातील आणखी दोन शिक्षकांचा कोरोनाने बळी गेला . पंढरपूर - मंगळवेढा पोटनिवडणूक मतदानासाठी कर्तव्य बजावत असताना त्यांना कोरोनाची लागण झाली . रविकिरण नागेश कुलकर्णी ( वय 45 ) व अरुण विश्वनाथ चंदनशिवे ( वय 46 ) अशी त्यांची नावे आहेत .
यापूर्वीही आणखी एका शिक्षकासह त्याच्या कुटुंबातील चौघांचा कोरोनाने मृत्यू झाला होता . पंढरपूर - मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीमुळे निवडणूक कामाच्या कर्तव्यावर गेलेल्या दोन शिक्षकांना यापूर्वी प्राणास मुकावे लागले होते . त्यातील एका कुटुंबातील चार जणांना कोरोनामुळे प्राण गमवावे लागल्याची घटना मागील काही दिवसांपूर्वी घडली होती . आता पुन्हा आणखी दोन शिक्षकांचा मृत्यू झाला असल्याची घटना सांगोला तालुक्यात घडली आहे . यात सांगोला तालुक्यातील घेरडी येथील शिक्षक रविकिरण नागेश कुलकर्णी हे पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा निवडणूक कर्तव्यावर गेले होते . तेथे कामावर असताना त्यांना कोरोनाची लागण झाली व अखेर उपचार घेत असताना दि . 29 मे रोजी पुणे येथे त्यांची प्राणज्योत मालवली . अगदी तरुण वयात मृत्यू झाल्याने त्यांचे कुटुंबउघड्यावर पडले आहे .मे रोजी पुणे येथे त्यांची प्राणज्योत मालवली . अगदी तरुण वयात मृत्यू झाल्याने त्यांचे कुटुंबउघड्यावर पडले आहे . काही दिवसापूर्वी अकोला ( वासुद ) ( ता . सांगोला ) येथील अरुण विश्वनाथ चंदनशिवे हेसुद्धा निवडणूक कर्तव्यावर गेले होते . तेसुद्धा कोरोना बाधित होऊनच परतले होते . त्यांचा दि .19 मे रोजी मृत्यू झाला . तसेच महिन्या - दीड महिन्या - दीड महिन्यापूर्वीही महिन्यापूर्वीही सांगोला तालुक्यातील एका शिक्षकाचा कोरोनाने मृत्यू झाला होता . त्याच्यासोबत कुटुंबातील आणखी तिघांना लागण होऊन त्यांचाही मृत्यू झाला होता . यामुळे या शिक्षकांच्या मृत्यूस जबाबदार कोण ? असा प्रश्न शिक्षकांचे नातेवाईक विचारीत आहेत . शिक्षकांना कोविड योद्धा म्हणून 50 लाखाचे विमा कवच मिळावे म्हणून अनेक दिवसापासून शिक्षकांच्या संघटना जि.प. प्रशासनाकडे व शासन दरबारी प्रयत्नशील आहेत . पण शासन याकडे लक्ष देईना . शासनाने रु .50 लाखाचा विमा मिळेल असा शासन आदेश काढला आहे . परंतु या शिक्षकांना कोविड योद्धा म्हणून सक्षम अधिकाऱ्यांचे लेखी आदेश नाहीत . त्यामुळे विमा कवचसाठी मागणी नोंदविता येत नाही . त्यामुळे वरिष्ठांनी नोंद घ्यावी , अशी मागणी होत आहे .


0 Comments