कपडे धुण्यासाठी गेलेल्या मामी आणि भाच्याचे सापडले मृतदेह. पंढरपूर तालुक्यातील चिंचोलीभोसे येथे शुक्रवारी कपडे धुण्यासाठी पायल लोंढे आणि त्यांचा भाचा जय जाधव हे दुपारी १२ च्या सुमारास गेले ..
तालुक्यातील चिंचोलीभोसे येथे शुक्रवारी कपडे धुण्यासाठी पायल लोंढे आणि त्यांचा भाचा जय जाधव हे दुपारी १२ च्या सुमारास गेले होते . त्यावेळी पाण्याचा अंदाज न आल्यामुळे ते दोघेही वाहून गेले होते . गुरुवारी दिवसभर त्यांचा शोध घेतला जात होता . मात्र , रात्र झाल्यानंतर शोधमोहीम थांबविण्यात आली होती . दरम्यान , शुक्रवारी सकाळपासून शोधमोहिमेला सुरुवात झाली . त्यानंतर सुरुवातीला चिंचोलीभोसेपासून काही अंतरावरच जय जाधव यांचा मृतदेह सापडला . त्यानंतर काही वेळात पायल लोंढे यांचा मृतदेह मिळून आल्याची माहिती तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण अवचर यांनी सांगितली . ::::: असा आहे परिवार पायल लोंढे यांच्या पाठीमागे पती , एक वर्षाचा लहान मुलगा असा परिवार आहे , तर भाचा जय जाधव हा कासेगाव येथे राहायला होता .


0 Comments