पु.अहिल्यादेवींच्या क्रांतिकारी विचारांची समाजाला आजही गरज : मा.आम. दिपकआबा सांगोला येथे केले अहिल्यादेवींच्या स्मृतीस नमन
सांगोला : तालुका प्रतिनिधी अठराव्या शतकात मराठा साम्राज्याची धुरा स्वतःच्या खांद्यावर यशस्वीपणे पेलून केवळ देशातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवर राज्यकारभार कसा करावा याचा पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांनी जगाला आदर्श घालून दिला छत्रपती शिवरायानंतर आपल्या जनतेची तितक्याच प्रामाणिकपणे सेवा करून प्रजाहितास नेहमीच प्राधान्य दिले म्हणून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या क्रांतिकारी विचारांची समाजाला आजही गरज असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष मा.आम. दिपकआबा साळुंखे पाटील यांनी केले.
सोमवार 31 मे रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून मा.आम. दिपकआबा साळुंखे-पाटील यांनी अहिल्यादेवीना वंदन केले यावेळी ते बोलत होते यावेळी जेष्ठ नेते तानाजीकाका पाटील, गटनेते आनंद माने, सोमनाथ लोखंडे, नाथा जाधव, मा. नगराध्यक्ष अनिल खडतरे, दिलीप मस्के, धनगर समाज सेवा मंडळाचे अध्यक्ष दत्तात्रय जानकर आदी उपस्थित होते. पुण्यश्लोक अहिल्यादेवी ने आपल्या कार्यकाळात आपल्या प्रजेचे उत्तम हित जपत आदर्श कारभाराचा एक नमुना सादर केला अहिल्यादेवींच्या कार्याची दखल केवळ देशातच नव्हे तर परदेशातही घेतली गेली.
अनेक इंग्रज अधिकारी व परदेशी तज्ञ अभ्यासकांनी अहिल्यादेवींच्या कार्यपद्धतीचे आणि मुत्सद्देगिरीचे कौतुक केल्याचेही शेवटी साळुंखे-पाटील यांनी स्पष्ट केले.
0 Comments