यवतमाळ यवतमाळ येथील चांदोरे नगर मध्ये राहणाऱ्या आणि शिक्षक असलेल्या संदीप लांडगे याने त्याच्या कडे शिक्षणासाठी असलेल्या मेहुनीवर बहिणीला ( संदीप ची पत्नी ) मारून टाकण्याची धमकी देत तिच्यावर मागील तीन वर्षांपासून बलात्कार करीत असल्याची धक्कादायक घटना घडली आहे .
मेहुणी गरोदर राहिल्याने ईने ही बाब संदीप याला सांगितल्यावर त्याने पुन्हा पत्नीला जीवे मारण्याची धमकी देत तिच्यावर बलात्कार केला . जावयाच्या अत्याचाराने कंटाळलेल्या पिडितेने याबद्दल आपल्या मोठ्या भावाला सांगितले . संदीप लांडगे विरोधात शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे . संदीप लांडगे ( वय 40 , रा . चांदोरेनगर , जि . यवतमाळ ) असे त्याचे नाव आहे . पीडितेच्या तक्रारीनुसार ती नांदेड जिल्ह्यातील रहिवासी आहे . मात्र , चार वर्षांपासून येथील एका महाविद्यालयात शिक्षण घेत आहे .शिक्षणासाठी म्हणून ती चांदोरेनगर येथे आपल्या बहिणीकडे राहते . परंतु शिक्षक असलेले भाऊजी तिच्या बहिणीला नेहमी मारहाण करतात . मला शारीरिक संबंध ठेवू दे , नाही तर तुझ्या बहिणीला मारतो अशी धमकी देत असल्याचे पीडिताने तक्रारीत म्हटले आहे . या धमकीला घाबरुन पीडिता गेल्या तीन वर्षांपासून बळी पडत आहे . याबाबत कोणाला सांगितल्यास जिवानिशी मारण्याची धमकीही दिली जात आहे . यातूनच पीडिता गर्भवती राहिली . तिने २६ मे रोजी आरोपीला माहिती देताच आरोपीने पुन्हा जीवे मारण्याची धमकी दिली व अत्याचार केला . अखेर पीडीताने आपल्या मोठ्या भावाला माहिती दिली . त्यानंतर गुरुवारी यवतमाळ शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली . तक्रारीवरून पोलिसांनी संदीप लांडगेविरुद्ध गुन्हा नोंद करून अटक केली आहे .


0 Comments