google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 पावसाळ्यात महामारीची तिसरी लाट येण्याची शक्यता, काळजी घ्या! – मुख्यमंत्री

Breaking News

पावसाळ्यात महामारीची तिसरी लाट येण्याची शक्यता, काळजी घ्या! – मुख्यमंत्री

 पावसाळ्यात महामारीची तिसरी लाट येण्याची शक्यता, काळजी घ्या! – मुख्यमंत्री


 मुंबई : सध्या राज्यात आलेली महामारीची भयानक लाट ओसरत असल्याची चिन्हे दिसत असून, राज्य सरकारने देखील गेल्या काही दिवसांत घेतलेल्या निर्णयांवरून आणि प्रसार माध्यमांशी साधलेल्या संवादावरून, राज्यातील रेड झोन मध्ये असलेल्या जिल्ह्यांव्यतिरिक्त इतर जिल्ह्यांतील लॉकडाऊनमध्ये शिथीतला दिली जाण्याची शक्यता आहे. मात्र, असे असले तरी राज्यातील लॉकडाऊन उठवला गेला नसून, तो आणखीन १५ दिवसांनी वाढवला आहे.या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी, राज्यातील जनतेशी, महाराष्ट्र मेडिकल काऊन्सिलच्या ऑनलाइन कार्यशाळेच्या उदघाटनावेळी संवाद साधला, यावेळी, ” राज्यात महामारीच्या तिसऱ्या लाटेची दाट शक्यता आहे. त्यामुळे आपल्या कुटुंबियांची काळजी घ्या,” असं आवाहन त्यांनी राज्यातील जनतेला केलं आहे.तसेच, पुढचे तीन महिने पावसाळ्याचे आहेत. याच काळात महामारी जास्त फोफावण्याची शक्यता डॉक्टर आणि शास्त्रज्ञांनी सांगितली आहे. त्यामुळे आपल्या कुटुंबीयांची काळजी घ्या. राज्य सरकार आपल्याकडून शक्य ते सर्व प्रयत्न करत आहे. महामारीवरील उपचारांसाठी घेण्यात येणाऱ्या औषधांचा अतिवापर देखील घातक ठरत असल्याचं आता सिद्ध झालं आहे. त्यामुळे औषधांचा अतिवापर टाळा,” असं देखील त्यांनी म्हटलं आहे.यावेळी, “महामारीची लक्षणे अंगावर अजिबात काढू नका. हा आजार इतर आजारांसारखा नाही. वेळीच योग्य उपचार घ्या आणि डॉक्टरांचा सल्ला घ्या. सल्ल्याशिवाय कुठलेही औषधे घेऊ नका. राज्यात महामारीसोबतच बुरशीजन्य रोगाचा प्रसार देखील वाढत आहे, काळजी घ्या!” असं म्हणत त्यांनी राज्यातील जनतेला आरोग्याची काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे.

Post a Comment

0 Comments