google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 पदोन्नती मध्ये आरक्षणाच्या मागणीसाठी रिपब्लिकन पक्षाचे दि .१ जून पासून राज्यभर आंदोलन - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

Breaking News

पदोन्नती मध्ये आरक्षणाच्या मागणीसाठी रिपब्लिकन पक्षाचे दि .१ जून पासून राज्यभर आंदोलन - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

  पदोन्नती मध्ये आरक्षणाच्या मागणीसाठी रिपब्लिकन पक्षाचे दि .१ जून पासून राज्यभर आंदोलन - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले पदोन्नतीमध्ये आरक्षण हा मागासवर्गीयांचा हक्क आहे . सर्वोच्च न्यायालयाने पदोन्नती मध्ये आरक्षण देण्याचा निर्णय राज्य सरकार ने घेण्याचे निर्देश दिले आहेत


. त्यानुसार पदोन्नती मध्ये आरक्षणाचा निर्णय राज्य सरकार ने त्वरित घ्यावा या मागणीसाठी येत्या दि . १ जून ते ७ जून पर्यंत रिपब्लिकन पक्षातर्फे राज्यभर आंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री ना . रामदास आठवले यांनी केली आहे . महाविकास आघाडी सरकार स्वतःला पुरोगामी म्हणणारे सरकार असले तरी पदोन्नती मधील मागसावर्गीयांच्या आरक्षण प्रश्नी महाविकास आघाडी चा बुरखा फाटला आहे . महाविकास आघाडी सरकार हे दलित विरोधी सरकार ठरले आहे . मागासवर्गीयांना पदोन्नती मध्ये आरक्षण देण्याचा निर्णय राज्य सरकार ने त्वरीत घ्यावा या मागणीसाठी राज्यभर प्रत्येक जिल्हा अधिकारी आणि तहसील कार्यलयावर दि .१ जून ते ७ जून पर्यंत रिपाइंतर्फे आंदोलन सप्ताह जाहीर करण्यात आला आहे . या आंदोलनात कोरोना प्रसाराचे नियम पाळून गर्दी न करता आंदोलन करण्याच्या सूचना ना रामदास आठवले यांनी दिल्या आहेत .

Post a Comment

0 Comments