पुणे येथील स्थित जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स च्या ०५ वी युवा संसद च्या साधारण जानेवारी २०२० मधील कार्यक्रमात भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते डॉ . भाई गणपतराव देशमुख यांच्या मुख्यमंत्री पदाबद्दल केले वक्तव्य असलेला व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे
. शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी आमदार डॉ . भाई गणपतराव देशमुख यांची राजकीय कारकीर्द खूप मोठी आहे . अशात त्यांनी २ वेळा मंत्री पद भूषविलेले आहे तर दुष्काळी भागातील सांगोला विधानसभेचे तब्बल ११ वेळा आमदार होते . त्यांचे साधी राहणीमान , अधिवेशन काळातील एसटी महामंडळाच्या बसने प्रवास , सांगोला तालुक्यासाठी उजनी धरणातून पाणी मिळण्यासाठी केलेला संघर्ष तसेच आशिया खंडातील सर्वात मोठी सांगोल्यात असलेली सुतगिरणी अशी त्यांनी ओळख निर्माण केली आहे . दरम्यान या व्हिडिओ मध्ये भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणतात की , आता ( सन २०१ ९ च्या निकालानंतर मुख्यमंत्री कोणाचा होणार शिवसेना की , भाजपा चा ? ) जे झाले ना ते सन १ ९९९ मध्ये पण झाले . पुरेशी मेजॉरिटी आली नाही आणि मग अन्य आमदार बरोबर यायचे असतील तर शिवसेनेचा मंत्री होणार ? , बीजेपी चा मुख्यमंत्री होणार ? शेवटी कालचक्र फिरत असते . त्यामुळे सन १ ९९९ ला असेच झाले . त्याच्या मध्ये शेवटी एकमत झाले की , कोणाचाच नको , गोपीनाथ मुंडे यांना पण नको , नारायण राणे यांना पण नको , पण , गणपतराव देशमुखांना मुख्यमंत्री करा . गणपतराव देशमुखांना यांच्या पार्टी चे ०३ आमदार ! पण गणपतराव व्यक्तिमत्त्व म्हणून सर्वांचे सहमत झाले . अशा प्रकारे राजकारणात येणे यशस्वी होणे पेक्षा सुद्धा वाहवा मिळवणे , त्याला ही समाधान मिळणार . मी राजकारणात येऊन काही करू शकला लो का नाही आनंद होणे हा माणूस होता म्हणून सांगोला तालुक्याचा विकास झाला . सांगोला तालुक्यात पाणी आले . आमच्या सांगोला तालुक्यामध्ये डाळिंब विदेशात जाऊ लागले हे सगळे श्रेय गणपतराव देशमुखांना जाते . अशा प्रकारची माणसे घडविण्यासाठी महाविद्यालयामध्ये काही व्यवस्था नाही . अशा प्रकारच्या इन्फॉर्मल रचना म्हणजेच युवा संसद कार्यक्रम नकीच युवा राजकारणी फायदेशीर ठरेल . सशक्त युवा , सशक्त भारत , सशक्त राजकारण असा विषय यात असतो . महाराष्ट्रातील सर्व स्थरातील ४०० ते ५०० युवा या कार्यक्रमात सहभागी होत असतात . छात्र संसद च्या धर्तीवर हा कार्यक्रम मराठीत राबिवला जातो . युवकांना मार्गदर्शन करण्यासाठी वेगवगळे आजी - माजी मंत्री , पक्षातील नेते , ज्येष्ठ पत्रकार मंडळी , आदी क्षेत्रातील तज्ञ व्यक्तींकडून त्यांचे विचार या युवकांना दिले जाते . सशक्त राजकारण करण्यासाठी चांगले लोक व नतिकतेचा वापर करणारे राजकारणात आले पाहिजे . सर्वसाधारण हा असा कार्यक्रम असतो अशी माहिती जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे प्राचार्य डॉ . सुधाकरराव जाधवर यांनी दिली . तर | उपाध्यक्ष अॅड . शार्दुल जाधवर यांनी युवा संसद आम्ही अजून सशक्त करण्यार असल्याचे सांगितले .


0 Comments