विज्ञान महाविद्यालयात स्वातंत्र्यवीर सावरकर यांना विनम्र अभिवादन
विज्ञान महाविद्यालय सांगोला येथे स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेस प्रमुख पाहुणे रोहित हेगडे उपप्राचार्य संभाजीराव शिंदे चेअरमन दीपक रिटे यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले
महाविद्यालयाचे उपप्राचार्य संभाजीराव शिंदे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे कार्य व जीवन चरित्र स्पष्ट करून स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिभा व त्यांची असलेली जिद्द याविषयी मार्गदर्शन केले प्रा दीपक रिटे मार्गदर्शन करताना म्हणतात की देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी सशस्त्र क्रांती करण्याची शपथ घेतली आणि ती स्वातंत्र्यवीर सावरकरांनी शेवटपर्यंत पाळली तारुण्य संसार घरदार आयुष्य याची देशासाठी राख रांगोळी करणारा वीर सावरकर हा एक दृष्टा युगपुरुष होता इंग्रजी शासनाने काळ्यापाण्याची शिक्षा ठोठावली असतानाही त्या कोठडीत ही त्यांनी आपली प्रतिभा जिवंत ठेवली आणि सहस्रावधी पानांचे वांग्मय लिहिणारा युगपुरुष क्रांतिकारक म्हणून स्वातंत्र्यवीर सावरकर यांना ओळखले जाते स्वातंत्र्यवीर सावरकर उत्कट देशभक्त जहाल क्रांतिकारक एक इतिहासकार प्रभावी वक्ता क्रियाशील सुधारक होते वयाच्या अवघ्या पंधराव्या वर्षी त्यांनी मातृभूमीला पारतंत्र्यातून मुक्त करण्यासाठी शपथ घेतली तेव्हा अशा या युगपुरुष आला विनम्र अभिवादन यावेळी रोहित हेगडे यांनीही आपले मनोगत व्यक्त करून स्वातंत्र्यवीर सावरकर यांची सखोल माहिती सांगितल
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा दीपक रिटे यांनी केले तर आभार गाडे सर यांनी मानले कार्यक्रमाला उपस्थित दशरथ रणदिवे चंद्रकांत पवार व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रम सोशल डिस्टंसिंग ठेवून पार पाडण्यात आला


0 Comments