google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 पारे ग्रा.पं.चे चाललय तरी काय? बिडीओ साहेब ग्रामसेवकाला जगवा.( ग्रामसेवकांच्या भोंगळ कारभारामुळे पारे गावात भीषण टंचाई )

Breaking News

पारे ग्रा.पं.चे चाललय तरी काय? बिडीओ साहेब ग्रामसेवकाला जगवा.( ग्रामसेवकांच्या भोंगळ कारभारामुळे पारे गावात भीषण टंचाई )

 पारे ग्रा.पं.चे चाललय तरी काय? बिडीओ साहेब ग्रामसेवकाला जागवा.( ग्रामसेवकांच्या भोंगळ कारभारामुळे पारे गावात भीषण टंचाई )सांगोला - भारत इंगवले ग्रामपंचायत चा कारभार सुव्यवस्थीत, तंञशुध्द, पारदर्शीपणे चालण्याकरीता तसेच शासन व ग्रामस्थ यांचा समन्वय साधणारा ग्रामसेवक असतो. परंतू हाच ग्रामसेवक झोपेचे सोंग घेऊन चालत असेल तर इतरांना रानमोकळेच. त्यांचा मनमानी कारभार म्हणजे हम करे सो कायदा अशीच परिस्थिती झाली आहे.


पारे गावठाण मध्ये पाणी पुरवठा संदर्भात अनेक तक्रारी आहेत .आठवड्यातून एक दोन दिवस पाणी सुरळीतपणे चालतो .आणि पुन्हा तेच दिवस तीच पाणी टंचाई आणि याला एकमेव कारण म्हणजे ग्रामसेवक व ग्रामपंचायत कार्यालय .या भोंगळ कारभाराचा फटका पारे गावातील सर्वसामान्य लोकांना बसत आहे.त्यामूळे सांगोला पं.स.चे कर्तृत्वदक्ष बिडीओ राऊत साहेब पारे गावच्या ग्रामसेवकाला जागवतील अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

शासनाने जनसामान्यांच्या गरजा लक्षात घेता प्रत्येक नागरिकाला हक्काचे पाणी मिळावे यासाठी नळयोजना कार्यान्वित केल्या. यासाठी शासनाने प्रादेशिक, ग्रामीण व जल प्राधिकरणाच्या अनेक योजनांमार्फत कोट्यवधींचा निधी खर्चून जनतेला पाणी पुरविण्याचे कार्य होत आहे. मात्र दुसऱ्याच्या हक्कावर गदा आणण्याच्या कुप्रथेमुळे आता जनसामान्यांना पिण्याचे पाणी मिळणे दिवसेंदिवस अवघड होत असल्याचा प्रत्यय पारे गावात दिसून येत आहे.

सांगोला तालुक्यातील पारे गावसाठी पाण्यासाठी प्रसिद्ध आहे या ठिकाणी इंग्रजांच्या काळातील घेरडी - पारे तलाव हे संपूर्ण महाराष्ट्रात सुप्रसिद्ध आहे .आणि यांच तलावाच्या शेजारी पारे ग्रामपंचायत ची भली मोठी विहीर आहे यामध्ये भरमसाठ पाणी साठा हि आहे .मात्र ग्रामपंचायतीमधील ग्रामसेवक व कर्मचाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे  ग्रामस्थाना पाणी असून पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. गावातील ग्रामस्थांना पाणी पुरवठा करणार्‍या विहिरीमधुन पाणी मिळत नसल्याची तक्रारी आहेत .पाणीटंचाई हि पारे गावच्या वाट्याला पाचवीला पुजलेली आहे. पण गेल्या दोन वर्षांत ती दिवसेंदिवस भीषण रूप धारण करू लागली असून माणसांना पिण्याला पाणी नाही मग जनावरांची काय बात म्हणून त्यांना विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. पावसाळा असू किंवा उन्हाळ्या वर्षानुवर्षे पारे गावातील ग्रामस्थ तहानलेलेच असतात.कोवीड -१९ च्या संसर्गापासून बचाव होण्यासाठी गर्दी करू नये असे नियम असताना पारे ग्रामपंचायत च्या  चुकीच्या धोरणामुळे पारे ग्रामस्थांना नाईलाजाने सार्वजनीक विहिरीवर गर्दी करायची वेळ आली आहे. लॉकडाऊन असल्याने नागरीक सध्या घरातच असतात तसेच उन्हाळा असल्याने पाण्याचा वापर भरपूर होत आहे मात्र ग्राम पंचातचा पाणी पुरवठा बंद झाल्याने नागरीक सार्वजनीक विहिरीवर गर्दी करीत असल्याने कोवीड नियमांचे पालन होत नाही त्यामुळे कोरोना च्या संसर्गात वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही ग्राम पंचायतने सुरळीत पाणी पुरवठा करून कोवीड नियमांचे होणारे उल्लंघन थांबवावे अशी मागणी होत आहे. गेल्या चार दिवसापासून पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे तर खाजगी टँकर चालकांकडे पाचशे लीटर पाण्यासाठी चार ते पाच रुपये मोजावे लागत आहे. एकीकडे काम धंदा बंद असल्याने ग्रामस्थ आर्थिक अडचणीत आहेत .तर दुसरीकडे विकतचे पाणी घेण्याची वेळ ग्राम पंचायतने आणल्याने नागरीक त्रस्त झाले आहेत तरी ग्रामपंचायतने कारभार सुधारित करून पारे गावचा पाण्याचा  कायमचा प्रश्न सोडवावा व पाणी पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी महिला वर्गातून होत आहे . विशेषतः गेल्या पंचवार्षिकला जे पाण्यासाठी लढा उभा करीत होते ते आता सत्ताधारी झाले आहेत .त्यामुळे त्यांना पाणी टंचाई काय आहे हे अनुभवले आहे .त्यामुळे त्यांनी देखील यामध्ये लक्ष देऊन पाणी पुरवठा सुरळीत करावा अशी हि मागणी पुढे येत आहे .

Post a Comment

0 Comments