Breaking News

धक्कादायक! मंगळवेढा सबजेलमध्ये एकाचवेळी १३ कैद्यांना करोनाची लागण

 धक्कादायक! मंगळवेढा सबजेलमध्ये एकाचवेळी १३ कैद्यांना करोनाची लागण


सोलापूर जिल्ह्यात पुन्हा एकदा करोनाचा धोका वाढत चालला असून मंगळवेढा पोलीस ठाण्याच्या सबजेलमधील ३८ पैकी १३ कैद्यांना करोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. याबाबतची माहिती मंगळवेढा पोलीस निरीक्षक जोतिराम गुंजवटे यांनी दिली आहे.सबजेलमध्ये सध्या विविध गुन्ह्यातील ३८ कैदी कोठडीत आहेत. त्यापैकी काही कैद्यांना गुरुवारी अचानक थंडी ताप आणि सर्दीचा त्रास सुरु झाला होता. तेव्हा पोलिसांनी या कैद्यांना तात्काळ मंगळवेढा शासकीय रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले.

त्यांना करोना संसर्गाची लक्षणे असल्याची शक्यता वाटल्याने डॉक्टरांनी त्यांची अँटीजेन टेस्ट करण्यास सांगितले. या टेस्टमध्ये १३ कैदी पॉझिटिव्ह आढळले त्यामुळं त्यांना पुढील उपचारासाठी तहसील कार्यालयाच्या सबजेल मध्ये ठेवण्यात आले आहे.

मागील आठवड्यात मंगळवेढा पोलिस स्टेशनचे ६ कर्मचारी बाधित आढळून आले होते आणि त्यात आता सबजेल मधील कैदी पॉझिटिव्ह आढळून आल्याने पोलिस प्रशासनावर ताण येत आहे.

मंगळवेढ्यात एका पोलीस अधिकाऱ्यासह सहा पोलिस कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा

मंगळवेढा पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले एक पोलिस अधिकारी व सहा पोलिस कर्मचारी असे एकूण सात जणांना कोरोनाची बाधा झाली आहे कोरोना महामारीच्या काळात रात्रंदिवस आपली चोख कामगिरी बजावणारे पोलिस दल यांचीही कोरोना महामारी संसर्गाच्या साथीमधून सुटका झाली नाही.रात्रंदिवस पोलिस दल जनतेच्या संरक्षणासाठी रस्त्यावर उभे राहून आपले कर्तव्य बजावत असताना मंगळवेढा पोलिस ठाण्यात एक पोलिस उपनिरीक्षक व चार पोलिस कर्मचारी तर मुख्यालयातून बंदोबस्तास आलेले दोन पोलिस कर्मचारी असे एकूण सातजण कोरोनाबाधीत झाले आहेत.गतवर्षीही पोलिस कर्मचाऱ्यांना मोठया संख्येने कोरोनाची बाधा झाल्याने बाहेरून पोलिस कर्मचारी मागवून कामकाज पाहण्याची वेळ आली होती. यंदाही पुन्हा पोलिस दलात कोरोनाने शिरकाव केल्याने चिंता वाढली आहे

Post a Comment

0 Comments