google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 HomeBreakingशरद पवार यांच्याकडून ममता बॅनर्जी यांचे अभिनंदन : 202 जागांवर तृणमूल्य काँग्रेस आघाडीवर

Breaking News

HomeBreakingशरद पवार यांच्याकडून ममता बॅनर्जी यांचे अभिनंदन : 202 जागांवर तृणमूल्य काँग्रेस आघाडीवर

 HomeBreakingशरद पवार यांच्याकडून ममता बॅनर्जी यांचे अभिनंदन : 202 जागांवर तृणमूल्य काँग्रेस आघाडीवर


शरद पवार यांच्याकडून ममता बॅनर्जी यांचे अभिनंदन : 202 जागांवर तृणमूल्य काँग्रेस आघाडीवर कोलकत्ता । दि.02 मे । पश्‍चिम बंगालमध्ये कमळ फुलणार की पुन्हा एकदा तृणमूल काँग्रेस सत्तेत येणार असा प्रश्‍न गेल्या अनेक दिवसापासून पडला होता. मात्र, आज निकालानंतर चित्र स्पष्ट होईल. ममता बॅनर्जी यांचा विजय होताना दिसत असून त्यांचे अभिनंदन सोलश मिडीयावरुन शरद पवार यांनी केला.एकीकडे कोरोनाने कहर केलेला असतानाही मतदानावर याचा फारसा परिणाम झालेला पहायला मिळाला नाही. राज्यात 84 लाख 77 हजार मतदार असून 80 टक्के मतदान झाले आहे. ममता बॅनर्जी गेल्या 10 वर्षांपासून सत्तेत असून पश्‍चिम बंगालमधील जनता पुन्हा एकदा त्यांच्या हाती सत्तेच्या चाव्या देणार का हे पाहावे लागणार आहे. ममता बॅनर्जी यांच्यासमोर भाजपाने कडवे आव्हान निर्माण केले आहे. स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मैदानात उतरुन जोरदार प्रचार केला आहे. यामुळे ममता बॅनर्जी यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीतील आव्हानात्मक निवडणुकीला सामोरे जावे लागत आहे.2016 च्या निवडणुकीत ममता बॅनर्जी यांच्या पक्षाला 210 जागा मिळाल्या होत्या. डाव्यांच्या आघाडीला 77 आणि भाजपाला 3 जागा मिळाल्या होत्या. तसेच अन्यला 4 जागा मिळाल्या होत्या. यंदाच्या निवडणुकीत भाजपाने अब की बार 200 पार म्हणत पश्‍चिम बंगालमध्ये जोरदार ताकद लावली होती. 

Post a Comment

0 Comments