धक्कादायक घटना! कारचा दरवाजा उघडल्याने मागून येणारा दुचाकीस्वार दचकला आणि…., बसखाली चिरडून मृत्यू
मुंबई, 10 एप्रिल: छोट्याशा चुकीमुळे एका तरुणाला प्राण गमवावा लागल्याची घटना मुंबईत घडली आहे. या घटनेसाच सीसीटीव्ही व्हिडीओ (CCTV ) अंगावर काटा आणणारा आहे. मुंबईतील बोरिवलीमध्ये ही घटना घडली असून यात 19 वर्षीय अमन यादवचा मृत्यू झाला आहे. अमन काही कामानिमित्त बोरीवली दौलत नगर येथील उत्सव हॉटेल समोरून जात होता त्यावेळी त्याच्याबरोबर ही दुर्दैवी घटना घडली आहे. त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला आहे.सविस्तर वृत्त असे की, शुक्रवारी संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास या परिसरातील उत्सव हॉटेल समोर काळया रंगाची एक गाडी पार्क होती. या गाडीतील चालकाने अचानक दरवाजा उघडला आणि त्याचवेळी अमन यादव या तरुण मागून दुचाकीवरून येत होता. कारचालकाने दरवाजा उघडल्याने अमन काहीसा दचकला आणि त्याचा गाडीवरील ताबा सुटला. या प्रकारानंतर त्याची गाडी रस्त्यावर घसरली आणि तेव्हाच भरधाव वेगाने येणाऱ्या BEST बसखली अमन चिरडला गेला. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला असून होटेल उत्सव समोर घडलेल्या प्रकारामुळे बोरिवली परिसरात एकच खळबळ माजली आहे.
0 Comments