ब्रेकिंग : राज्यात लॉकडाऊनशिवाय पर्याय नाही – उद्धव ठाकरे
15 एप्रिल ते 21 एप्रिलपर्यंत परिस्थिती गंभीर होऊ शकते. ऑक्सिजिनचा तुटवडा जाणवू शकतो. कोव्हिडसाठी 960 मेट्रिक टन ऑक्सिजनची मागणी, अध्याप 1200मेट्रिक टन राज्याची उत्पादन क्षमता, रेमडिसीव्हरचा तुटवडा आहे. त्यामुळे लॉकडाऊनची वेळ आली आहे. लॉकडाऊनशिवाय दुसरा कोणता पर्याय नाही. आम्ही कुठे कमी पडतो आहे का ? असे केंद्र सरकारला विचारणा करीत आहोत लॉकडाऊनशिवाय दुसरा पर्याय नाही जगानेही तो स्वीकारला आहे. लॉकडाऊन करायची वेळ आली आहे, कारण यंत्रणांचा शक्तीपात होऊ नये. निर्णय घेण्याची वेळ आली आहे, कळत नकळत प्रसार हा फार घातक आहे. तरुण वर्ग जास्त बाधित होत आहे हे आढळून येत आहे., असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ऑनलाइनच्या माध्यमातून शनिवारी सर्वपक्षीय बैठक घेतली. यात महाराष्ट्राच्या लॉकडाऊनसंबंधात निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई येथे ऑनलाईन होणाऱ्या या बैठकीला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील प्रमुख नेत्यांची उपस्थिती आहे.
0 Comments