दुचाकीवर फक्तचालकास परवानगी गाडी जप्त केल्यास ३० एप्रिलनंतर मिळणार- पोलीस उपायुक्त डॉ. वैशाली कडूकर
सोलापूर: कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी व रविवारी कडक लॉकडाऊन राबविण्यात येणार असून अत्यावश्यक कामास बाहेर पडल्यानंतर दुचाकीवर फक्त चालकाला परवानगी आहे. या काळात गाडी जप्त केल्यानंतर ती लॉकडाऊन मुदत संपल्यानंतर म्हणजे ३० एप्रिलनंतर दंड भरुन परत देण्यात येईल, अशी माहिती पोलीस उपायुक्त डॉ. वैशाली कडूकर यांनी दिली.कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने नागरिकांनी आपल्या अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर पडू नये, ६० वर्षांपेक्षा जास्त व दहा वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांनी दोन दिवस अजिबात घराबाहेर अत्यावश्यक फिरू नये. ज्येष्ठ नागरिकांच्या घरी बाजारातून जीवनावश्यक वस्तू आणायला जाण्यास कोणी नसेल तर शेजाऱ्यांची मदत घ्यावी किंवा पोलिसांना १०० नंबरवरून फोन करुन पोलिसांची मदत घ्यावी. पोलीस आपल्या घरी येऊन जीवनावश्यक वस्तू आणून देतील, असे डॉ. कडूकर म्हणाल्या.नागरिकांना कामासाठी जायचे असल्यास दुचाकीवर फक्त चालकाला परवानगी आहे. डबल किंवा ट्रीपल सीट वाहन चालवू नये. तसे आढळल्यास त्यांची दुचाकी जप्त करण्यात येईल. व ती गाडी लॉकडाउन संपल्यानंतर गाडीवर आधी असलेला दंड भरून घेऊन, कागदपत्रे तपासून परत देण्यात येईल, असेही कडूकर म्हणाल्या.महाराष्ट्रात लॉकडाऊनचा निर्णय दोन दिवसात : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेदि.10 : महाराष्ट्रात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पुन्हा एकदा कडक लॉकडाऊन लागण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. आज या संदर्भात मुख्यमंत्र्यांची सर्व पक्षांच्या नेत्यांसोबत बैठक सुरु आहे. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून आयोजित केलेल्या या बैठकीला मुख्यमंत्री ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री अशोक चव्हाण, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, चंद्रकांत पाटील, एकनाथ शिंदे, विजय वडेट्टीवार, मुख्य सचिव सीताराम कुंटे उपस्थित आहेत.महाराष्ट्रात कोरोनाचा (Coronavirus) वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत राज्यातील सर्वपक्षीय नेत्यांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे महत्त्वाची बैठक पार पडली. कोरोना विषाणूची साखळी तोडायची असेल तर सलग 10 किंवा 21 दिवसांचा कडक लॉकडाऊन लावण्याच्या प्रस्तावावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चर्चा केली. या बैठकीत कडक लॉकडाऊन लावण्याचे संकेत दिले आहेत. ‘जनतेला समजावू शकतो पण करोनाला समजावू शकत नाही’असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे बैठकीच्या शेवटी आपला निर्णय काय… कडक लॉकडाऊन पण जनतेचा उद्रेक यामध्ये मार्ग काढावा लागेल. थोडा वेळ सर्वांना कळ सोसावी लागेल. जनतेला समजावू शकतो पण करोनाला समजावू शकत नाही. मी ज्या सर्वांशी चर्चा केली त्यांना सर्वांनी सहकार्य केलं व्यापारी उद्योजक. याला काही अवधी लागेल एक दोन दिवसात व्यापारांचा प्रश्नं सोडवू. नाहीतर सर्व काही सुरू ठेवा आणि जे काही अनर्थ ओढवेल त्याला सामोर जावं लागेल असं मुख्यमत्र्यांनी म्हटलं.लसीचे दोन्ही डोस घेतल्या नंतर काही व्यक्ती कोरोना पॉस्टिव्ह आढळल्या आहेत या बाबत पंतप्रधान यांच्याशी बोललो. देवेंद्र फडणवीसजी काल आपण बैठकीत नव्हता आपल्यासाठी ही बैठक आहे. आता निर्णय घेण्याची वेळ आली आहे. असं सूचक वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत केलं आहे.मुख्यमंत्र्यांनी म्हटलं की, मधला काळ बरा होता. तरुण वर्ग आता जास्त बाधित होतोय. आपल्याला एकमुखाने निर्णय घ्यायचा आहे. असं ही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. कडक निर्बंध आणि काही प्रमाणात सूट हे उपयोगाचे नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.महाराष्ट्रात कोरोनाची परिस्थिती बिकट होत आहे. बेड्स उपलब्ध नाहीत. वेंटिलेटर फूल आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर आता प्रचंड ताण येऊ लागला आहे. कोरोनाचे रुग्ण रोज झपाट्याने वाढत असल्याने त्याला रोखण्याचं मोठं आव्हान सरकारपुढे असणार आहे.राज्यात कोरोना रुग्णांचा आकडा हा आता चिंतेचा विषय बनला आहे. कडक निर्बंध लागू करुनही रुग्णसंख्या वाढतच आहे. त्यामुळे लॉकडाऊन शिवाय पर्याय नसल्याचं अनेकांचं मत आहे. लॉकडाऊनमुळे पुन्हा आर्थिक घडी मोडण्याची शक्यता आहे. पण नागरिकांचा जीव आणि आरोग्य हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. त्यामुळे आता सरकार काय निर्णय घेणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कडक लॉकडाऊनची गरज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वपक्षीय बैठकीत व्यक्त केलीय. मात्र, याबाबतचा निर्णय येत्या दोन दिवसांत घेतला जाईल असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय. राज्यातील स्थितीचा अंदाज घेऊन निर्णय घेऊ, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे. तसंच सर्वांनी सहकार्य करावं अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी केलीय. राज्यातील स्थिती पाहता जनतेला थोडी कळ सोसावी लागेल. तज्ज्ञांच्या मते 14 दिवसांचा लॉकडाऊन गरजेचा आहे. तज्ज्ञांच्या मताला मुख्यमंत्र्यांनीही दुजोरा दिलाय. मात्र, मुख्यमंत्री किमान 8 दिवस कडक लॉकडाऊन करण्याच्या विचारात आहेत. 8 दिवसानंतर एक एक गोष्ट हळू हळू सुरु करु, अशी भूमिका मुख्यमंत्र्यांनी मांडली आहे.
0 Comments