google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 पोलीसाशी हुज्जत घालून गुन्हातील आरोपीस पळविले ; दोन जणांवर गुन्हा दाखल

Breaking News

पोलीसाशी हुज्जत घालून गुन्हातील आरोपीस पळविले ; दोन जणांवर गुन्हा दाखल

 सांगोला ( प्रतिनिधी ) : - गुन्ह्यातील पकडलेला आरोपी हाच आहे का याची खातरजमा करीत असताना दोन जणांनी पोलिसा जवळ येऊन हा काय गुन्हेगार आहे का , तुम्हाला त्यास आम्ही घेऊन जाऊ देणार नाही अशी हुज्जत घालून आरोपीस दुचाकीवरून पळवून नेल्याची घटना शुक्रवार दि . २३ एप्रिल रोजी सकाळी साडेदहा वाजता महूद ता.सांगोलायेथे घडली आहे


. एक जणावर दोन दिवसापूर्वी भादवि कलम ३७ ९ , ३४ अन्वये गुन्हा दाखल होता काल शुक्रवार दि .२३ रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास पोलीस तपास करीत असताना महुद येथील पोलीस पाटील कांबळे यांच्यासोबत एक इसम बोलत उभा असलेला दिसून आला पोलिसांना या इसमाबाबत शंकाआल्याने पोलिसांनी पो.पा. कांबळे यांच्या जवळील इसमास बोलवले व नाव विचारले असता त्याने त्यांचे नाव सांगितले . त्यामुळे पोलिसांची खात्री झाली की या सदर इसमावर दोन दिवसापूर्वी गुन्हा दाखल झालेला तो हाच इसम आहे दरम्यान पोलिसांच्या परिचयाचे २ व्यक्ती हे पोलिसाजवळ आले वत्यांनी सदर व्यक्तीकडे इशारा करीत हा काय गुन्हेगार आहे का , तुम्हाला त्याच्यावर कारवाई करू देणार नाही असे म्हणाले व अचानक दुचाकी सुरू करून चौकशी करीत असलेल्या संशयित आरोपी यास दुचाकीवर बसवून पळून गेल्याची घटना घडली आहे याबाबत पो.ना.संजय राऊत यांनी दोन जणांविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे

Post a Comment

0 Comments