हॉटेल अजिंक्यतारा येथे येऊन मालक व कर्मचारी यांना जबर मारहाण करून जातीवाचक शिवीगाळ केलीऍट्रोसिटी ऍक्ट व दरोड्याचा गुन्हा दाखल
मंगळवेढा प्रतिनिधी: ( शब्दरेखा एक्सप्रेस न्युज)सांगोला तालुक्यातील वाकी शिवणे येथील रहिवासी किरण डांगे यांचा हॉटेल व्यवसाय असून हॉटेलवर येऊन पंधरा ते वीस जणांच्या टोळक्याने प्राणघातक हल्ला करून किरण डांगे यांना धारदार शस्त्राने जबर मारहाण करून जवळचे 50 हजार रुपये रोख जबरदस्तीने काढून घेतले तसेच सीसीटीव्ही, टीव्ही, डीव्हीआर या वस्तूंची तोडफोड करून जातीवाचक शिवीगाळ तसेच जीवे मारण्याचा प्रयत्न करून दहशतीचे वातावरण निर्माण केले.
याबाबत सविस्तर माहिती अशी की सांगोला महूद रोड येथील हॉटेल अजिंक्यताराचे मालक किरण डांगे व व्यवस्थापक सागर बनसोडे,व गवळी या तिघांवर पंचवीस ते तीस जणांच्या घोळक्याने प्राणघातक हल्ला करून हॉटेलची नासधूस करून मोठया प्रमाणात नुकसान केले. या घटनेचे मुख्य सूत्रधार संतोष रोकडे,नाना रोकडे,सुधाकर सपाटे, अजय बुचडे, हॉटेल सुष्टी चे मालक सनी इंगोले व इतर सर्व राहणार वाकी (शिवणे) तालुका सांगोला हे सर्वजण मिळून हॉटेल अजिंक्यतारा येथे येऊन मालक व कर्मचारी यांना जबर मारहाण करून जातीवाचक शिवीगाळ केली परंतु सांगोला पोलीस स्टेशनने केवळ मारहाणीचा गुन्हा दाखल केला होता पण त्यांच्यावर ऍट्रोसिटी ऍक्ट व दरोड्याचा गुन्हा दाखल झालाच पाहिजे असे राष्ट्रीय चर्मकार महासंघ शहर जिल्हा सोलापूरच्या वतीने मागणीचे निवेदन पोलीस उपअधीक्षक अतुल झेंडे यांना देण्यात आले व आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी राष्ट्रीय चर्मकार महासंघ यांनी लावून धरल्यामुळे जिल्हा पोलिस प्रशासनाने याची दखल घेत ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करून या घटनेचा तपास
उपविभागीय पोलिस अधिकारी मंगळवेढा यांच्याकडे दिला परंतु
या तपासामध्ये दिरंगाई होत असल्याचे किरण डांगे यांनी राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे प्रदेश कार्याध्यक्ष संजय बाबा शिंदे यांना सांगितले असता संजय बाबा शिंदे यांनी तात्काळ दखल घेऊन पंढरपूर तालुका अध्यक्ष संतोष कांबळे तसेच मंगळवेढा तालुकाध्यक्ष धनाजी खडतरे, युवक जिल्हा सहसचिव सुधाकर कांबळे, ऐडवोकेट दत्तात्रेय खडतरे व राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या पदाधिकाऱ्यां समवेत मंगळवेढा उपविभागीय कार्यालयात निवेदन देऊन आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी केली.
त्या अनुषंगाने तीन आरोपींना अटक करण्यात आली असून उर्वरित आरोपी लवकरच अटक करणार असल्याचे पोलिस प्रशासनाकडून सांगण्यात आले. यावेळी प्रदेश कार्याध्यक्ष संजय बाबा शिंदे, पंढरपूर तालुका अध्यक्ष संतोष कांबळे, सुधाकर कांबळे, एडवोकेट दत्तात्रेय खडतरे, मंगळवेढा तालुका अध्यक्ष धनाजी खडतरे, सुनील रोकडे, नितीन लेंडवे आदी उपस्थित होते.
0 Comments