google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 आनंद हॉस्पिटल येथे कोव्हिड व नॉनकोव्हिड सुविधा | नागरिकांच्या आरोग्याचा विचार करता दोन्ही सुविधा वेगवेगळ्या ठिकाणी

Breaking News

आनंद हॉस्पिटल येथे कोव्हिड व नॉनकोव्हिड सुविधा | नागरिकांच्या आरोग्याचा विचार करता दोन्ही सुविधा वेगवेगळ्या ठिकाणी

 सांगोला शहरातील आनंद हॉस्पिटल येथे नागरिकांच्या सुविधे बरोबर अतिमहत्त्वाची दक्षता म्हणून कोव्हिड व नॉनकोव्हिड सुविधा ह्या वेगवेगळ्या सुरू करण्यात आले आहे . येथे कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांसाठी आयसोलेशन वर्ड हा वेगळा असून तेथे प्रत्येक पेशंट साठी सर्व सुविधा या वेगवेगळ्या करण्यात आले आहेत .


सांगोला शहरासह तालुक्यामध्ये कोरोना चा उद्रेक होताना पाहावयास मिळत आहे आणि शहरातील हॉस्पिटलमध्ये कोरोना रुग्णांना बेड मिळत नाहीत अशा - परिस्थिती मध्ये आनंद हॉस्पिटल येथे कोरोना रुग्णांनाबेड उपलब्ध करून देऊन कोव्हिड व नॉनकोव्हिड सुविधा सुरू करण्यात आली आहे . दवाखान्या मध्ये येणारा प्रत्येक पेशंट हा कोरोना पॉझिटिव्ह असेल असे नाही एखाद्या पेशंटला ताप सर्दी खोकला या व्यतिरिक्त काही हजार असेल तर त्यास कोरोना पॉझिटिव रुग्णांच्या वॉर्डमध्ये ठेवले असता कोरोना न झालेल्या रुग्णांनाही यातून पुरणाचा धोका होऊ शकतो हा धोका होऊ नये यासाठी कोव्हिड व नॉनकोव्हिड वॉर्ड वेगवेगळे करून येथे सर्वच रुग्णांवर उपचार सुरू आहेत . तसेच नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी २४ तास हॉस्पिटल सुरू राहणार आहे .

Post a Comment

0 Comments