google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 शासनाने घालून दिलेल्या नियमांचे सर्रासपणे उल्लंघन...नागरिक मोठ्याप्रमाणात गर्दीमहसूल,पोलीस , न.पा.प्रशासनाचा निष्काळजीपणा !

Breaking News

शासनाने घालून दिलेल्या नियमांचे सर्रासपणे उल्लंघन...नागरिक मोठ्याप्रमाणात गर्दीमहसूल,पोलीस , न.पा.प्रशासनाचा निष्काळजीपणा !

 सांगोला शहरातील व्यावसायिका कडून सुरक्षित अंतर नियमांचा बोजवारा ; महसूल,पोलीस , न.पा.प्रशासनाचा निष्काळजीपणा ! सांगोला शहरातील अत्यावश्यक सेवेतील दुकाने सकाळी ७ ते ११ या वेळेत उघडी ठेवण्याची मुभा देताना प्रशासनाने नियम,अटी घालून दिलेल्या आहेत.


परंतु शासनाने घालून दिलेल्या नियमांचे सर्रासपणे उल्लंघन होत आहे. शहरातील अनेक दुकानात तालुक्यातील ग्रामीण भागातून खरेदी करण्यासाठी आलेले नागरिक मोठ्याप्रमाणात गर्दी करत असल्याचे दिसून येत आहेत

. या गर्दीवर ना व्यापा-यांचे नियंत्रण आहे ना प्रशासनाचे ? त्यामुळे व्यापाऱ्यांच्या व प्रशासनाच्या या गलथान कारभाराचा फटका शहरातील नागरिकांना बसत असून

, शहरातील कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. त्यामुळे महसूल, पोलीस व नगरपालिका प्रशासनाने शहरातील होणाऱ्या या अनावश्यक गर्दीवर तातडीने लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे.

Post a Comment

0 Comments