google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 केंद्र सरकारचा गंभीर ईशारा ; घरातही मास्क वापरण्याची सूचना

Breaking News

केंद्र सरकारचा गंभीर ईशारा ; घरातही मास्क वापरण्याची सूचना

 केंद्र सरकारचा गंभीर ईशारा ; घरातही मास्क वापरण्याची सूचना


देशात सलग पाचव्या दिवशी रुग्णसंख्येचा उच्चांक नोंदवण्यात आला आहे. कोरोनामुळे मृत्यूंचे प्रमाणही वाढत आहे. कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य यंत्रणेवरील ताण वाढत आहे. ऑक्सिजन, रेमडेसिवीर इंजेक्शन, बेड्स, कोरोना लसींचा तुटवडा जाणवत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून जनतेला गंभीर इशारा देण्यात आला आहे. आता घरबसल्याही मास्क घालण्याची वेळ आली आहे अशी गंभीर सूचना वजा आदेश केंद्र सरकारकडून करण्यात आली आहे. दरम्यान या आदेशाबाबत जनतेकडून खिल्ली उडवली जात असून तुम्ही सभा घ्या आणि जनतेला घरात मास्क घालायला लावा, किती लोकांना वेड्यात काढाल अशा टीका व कमेंट सोशल मीडियातून केल्या जात आहेत.केंद्र सरकारच्या नीती आयोगातील आरोग्य विभागातील सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी यासंदर्भात माहिती जाहीर केली आहे. कोरोनाच्या या गंभीर काळात विनाकारण घराबाहेर पडू नका. एवढेच नव्हे, तर घरातील सदस्यांनी कुटुंबांसोबत घरबसल्या मास्क घाला. मास्क घालणे अतिशय महत्त्वाचे आहे. याशिवाय कोणालाही घरी बोलावू नका, असे ही पॉल यांनी म्हटले आहे.ऑक्सिजन पुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न देशभरातील अनेक राज्यांमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे. भारतीय रेल्वेने पुढाकार घेत ऑक्सिजन एक्स्प्रेस सुरू केली आहे. अनेक राज्यांमध्ये ऑक्सिजन एक्स्प्रेसची सेवा दिली जात आहे. विशाखापट्टनमनंतर गुजरातमधील हापा येथे असलेल्या रिलायन्सच्या प्रकल्पातून महाराष्ट्रासाठी दुसरी ऑक्सिजन एक्स्प्रेस दाखल झाली. या तीन ट्रकपैकी दोन ऑक्सिजन ट्रक मुंबई, तर एक पुण्याला पाठवण्यात आला आहे.केंद्र सरकारकडून महत्वाचा निर्णय देशभरात जिल्हा मुख्यालय स्तरावर ५५१ वैद्यकीय ऑक्सिजन निर्मिती करणारे प्रकल्प उभारण्याचा महत्त्वाचा निर्णय केंद्रातील मोदी सरकारने घेतला आहे. या सर्व प्रकल्पांसाठी पीएम केअर्स फंडातून निधी उपलब्ध केला जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यासंदर्भात निर्देश दिले आहेत. मात्र अद्याप पावेतो देशात लाखो रुग्ण मरत असतांना महाराष्ट्रात एकही ऑक्सिजन प्रकल्प उभारण्यात आलेला नाही. अशी टीका विरोधी पक्षांकडून केली जात आहे.दरम्यान, सरकारी रुग्णालयात वैद्यकीय वापराकरिता ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारण्यामागे सार्वजनिक आरोग्य यंत्रणा मजबूत करणे हेच ध्येय यामागे असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे सरकारी रुग्णालयात अचानक ऑक्सिजनची कमतरता भासणार नाही. मागणी एवढा ऑक्सिजन पुरवठा नियमित सुरू राहील, असे सांगितले जात आहे.

Post a Comment

0 Comments