१०८ रुग्णवाहिकेसाठी रुग्णांच्या नातेवाईकांना करावे लागते वेटिंग कोरोना महामारीत गरज वाढल्याने रुग्णांचे नातेवाईक १०८ क्रमांकावर सतत संपर्क साधून रुग्णवाहिकेची मदत घेत आहेत . पूर्वी रस्त्यावर अपघात किंवा ...कोरोना महामारीत गरज वाढल्याने रुग्णांचे नातेवाईक १०८ क्रमांकावर सतत संपर्क साधून रुग्णवाहिकेची मदत घेत आहेत .
पूर्वी रस्त्यावर अपघात किंवा गरीब लोक आजारपणात १०८ वर संपर्क साधून सरकारी रुग्णवाहिकेची मदत होत होती . पण , आता कोरोना महामारीच्या काळात रस्त्यावर एकही वाहन मदतीला येत नसल्याने सर्वसामान्यांसह श्रीमंतसुद्धा १०८ वर संपर्क साधून रुग्णवाहिकेची मदत मागत आहेत . सोलापूर शहरासह ग्रामीण भागात मागणी वाढल्याने १०८ रुग्णवाहिकेचे कॉल आता वेटिंगवर आहेत . जिल्ह्यातील १०८ च्या ३५ रुग्णवाहिकांवर १०८ डॉक्टरांसह ८० चालक सेवा देत आहेत . यातील २१ रुग्णवाहिका कोरोना रुग्णांसाठी राखीव ठेवल्या आहेत . सोलापूर जिल्ह्यात एप्रिल २०२० ते मार्च २०२१ या कालावधीत ३१ हजार ६२ कोरोनाबाधितांना तत्पर सेवा देऊन जीवदान दिले आहे , तर इतर १३ हजार ४५४ रुग्णांना रुग्णालयात दाखल केले आहे . जानेवारीत १६२८ कोरोनाबाधित व इतर २१४७ , फेब्रुवारीत ३११५ कोरोनाबाधित व २०२ ९ इतर तर मार्चमध्ये ४ ९९ १ कोरोनाबाधित व इतर ९ ०७ रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात पोहोचवण्याची जबाबदारी १०८ रुग्णवाहिकांनी पार पाडली आहे . कोट सोलापूर जिल्ह्यात असलेल्या ३५ पैकी १० रुग्णवाहिका ( एएलएस ) व २५ रुग्णवाहिका ( बीएलएस ) आहेत . त्यातील २१ रुग्णवाहिका कोरोना रुग्णांसाठी राखीव ठेवल्या कोरोनाच्या काळात अतिगभीर रुग्णाना व्हेंटिलेटर सपोर्ट व ऑक्सिजनवर असणाऱ्या रुग्णांना १०८ रुग्णवाहिकेमुळे जीवदान मिळाले आहे . रुग्णवाहिकेत डॉक्टर उपलब्ध असल्यामुळे रुग्णांवर तातडीने उपचार करून रुग्णालयात दाखल केले जाते . - अनिल काळे जिल्हा व्यवस्थापक , १०८ रुग्णवाहिका
0 Comments