google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला येथील आढावा बैठकीत पालकमंत्र्यांनी जाणून घेऊन तालुक्यातील या 23 गावांचे अभिनंदन केले

Breaking News

सांगोला येथील आढावा बैठकीत पालकमंत्र्यांनी जाणून घेऊन तालुक्यातील या 23 गावांचे अभिनंदन केले

 सांगोला येथील आढावा बैठकीत पालकमंत्र्यांनी जाणून घेऊन तालुक्यातील या 23 गावांचे अभिनंदन केले. अशा गावांचा आदर्श संपूर्ण राज्यांनी घ्यावा असे आवाहनही पालक मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले.


सांगोला (सोलापूर) : संपूर्ण देशात कोरोनाचा हाहाकार सुरू असतानाच सांगोला तालुक्यातील 23 गावांनी कोरोनाचा विषाणू आपल्या सीमेवरच आडवीला आहे. या 23 गावांत अद्याप कोरोनाचा एकही कोरोना रुग्ण आढाळला नाही. सांगोल्यात कोरोना आढावा बैठक घेतल्यानंतर पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी तालुक्यातील या 23 गावांचे अभिनंदन करुन या गावांचा आदर्श संपूर्ण राज्याने घ्यावा असेही आवाहन केले.कोरोनाच्या महामारीने संपूर्ण जगच हतबल झाले आहे. सोलापूर जिल्ह्यासह सांगोला तालुक्यात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. रुग्णांना सध्या बेड मिळणेही मुश्कील झाले आहे तर काहींना बेड मिळाल्यानंतर पुढील उपचारासाठी ऑक्‍सिजन व रेमडेसिव्हिर इंजेक्शनही प्रशासन पुरविण्यास असमर्थ झाले आहे. त्यामुळे अनेकांना उपचाराअभावी आपले जीव गमवावा लागत आहे. अशा परिस्थितीतही कोरोना महामारीच्या काळात सांगोला तालुक्यातील 103 गावांपैकी 23 गावांमध्ये अद्याप एकही रुग्ण सापडलेला नाही. त्यामुळे अशा गावांमधून कोरोना रुग्ण होऊ नये यासाठी कोणते प्रयत्न केले, याबाबत सांगोला येथील आढावा बैठकीत पालकमंत्र्यांनी जाणून घेऊन तालुक्यातील या 23 गावांचे अभिनंदन केले. अशा गावांचा आदर्श संपूर्ण राज्यांनी घ्यावा असे आवाहनही पालक मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले.कोरोना रुग्ण नसलेली गावेकोरोना सातारकरवाडी, जाधववाडी, बंडगरवाडी, करांडेवाडी, डिकसळ, नराळे, हबीसेवाडी, हनुमंतगाव, गळवेवाडी, खारवटवाडी, शिवणे, मेटकरवाडी, तिप्पेहळी, हटकर मंगेवाडी, गुणापवाडी, मिसाळवाडी, झापाचीवाडी, कोंबडवाडी, काळूबाळूवाडी, करांडेवाडी, सरगरवाडी, बंडगरवाडी, नलवडेवस्ती.तालुक्यातील या 23 गावचे नागरिक खरोखरच आदर्शवत आहेत. त्यांनी या महामारीच्या काळातही कोरोना आपल्या गावापासून दूर ठेवण्यासाठी केलेले प्रयत्न अभिनंदनीय आहेत. अशा गावांचा आदर्श संपूर्ण राज्यांनी घेऊन सर्वांनी कोरोनाची साखळी तोडण्यासाठी एकत्रीत प्रयत्न केले पाहिजेत.ही गावे लहान असली तरीसुद्धा येथील नागरिकांनी आपल्या गावात शिरकाव होऊ नये, यासाठी मोठी काळजी घेतली आहे. तिथे काम करणारे अधिकारी, कर्मचारी, नागरिक हे कौतुकास्पद कार्य करीत असून सध्याच्या कोरोना संकटकाळात नागरिकांनी न भिता स्वतःची काळजी घ्यावी. स्वतःची काळजी घेतली तर कुटुंबाची व गावाची काळजी घेतल्यासारखी आहे.

Post a Comment

1 Comments

  1. Inspiration and motivation given by hon solapur guardian minister Datta mama is GREAT to people of sangola.

    ReplyDelete