" सांगोला पोलीसाकडून परमिट रूमला सील ठोकले . " सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव मोठया प्रमाणावर वाढत आहे . महाराष्ट्र शासनाकडून , जिल्हा अधिका - याकडून , सांगोला पोलीस स्टेशनकडून लॉकडाऊनवे नियम पाळण्याबाबत वेळोवेळी सुचना करण्यात आलेल्या आहेत .
लोक त्या सुचनाचे पालन करत नाहीत . सांगोला पोलीसांनी वेळोवेळी मास्क न वापरणे , विनाकारण फिरणारे , सोशल डिस्टनस न पाळणारे , दुकाने निर्धारित वेळेत चालु न ठेवणारे अशा लोकांवर व संस्थेवर कारवाईकरून दंडात्मक रक्कम वसुल करण्यात आली आहे . तसेच वाहने जप्त करण्यात आलेली आहेत . दुकाने सिल करण्यात आलेली आहेत . तसेच आघावु पणा करणारेवर गुन्हे दाखल करून अटक करण्यात आलेली आहे . लग्न सोहळयामध्ये २५ पेक्षा जास्त लोक जमल्यामुळे त्याच्यावर ही गुन्हे दाखल करण्यात आलेली आहेत . अशा प्रकारे सांगोला पोलीसांनी कारवाई करूनही लोकांच्यात फरक पडत नाही . दि . २४/०४/२०२१ रोजी संध्याकाळी पो.नि. निंबाळकर यांना गुप्त बातमी मिळाली की , शाही दरबार बिअरबार व परमिट रूम , जवळा हे हॉटेल दिवसा ढवळया उघडे ठेवुन दारूवी विक्री करत असल्याबाबत माहीती मिळाली व तात्काळ पो.नि. निंबाळकर व इतर स्टाफसह सायं . १८/३० वा . त्या ठिकाणी छापा टाकला असता . सदर ठिकाणी हॉटेल शाही दरबार बिअरबार व परमिट रूम , जवळा चे मॅनेजर चंद्रकांत ईश्वर शिंदे रा . आलेगाव ता . सांगोला हे दारूची विक्री करत असताना मिळुन आले . लागलीच दोन पंचा समक्ष पंचनामा करून हॉटेल शाही दरबार बिअरबार व परमिट रूम , जवळा हे पुढील आदेशापर्यंत सिल करण्यात आले व हॉटेल मालक इंद्रजित तानाजीराव घुले रा . जवळा ता . सांगोला व हॉटेलचे मॅनेजर चंद्रकांत ईश्वर शिंदे रा . आलेगाव ता . सांगोला यांचेवर सांगोला पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करून हॉटेल मॅनेजर यास अटक करण्यात आलेली असुन हॉटेल मालक हे फरार आहेत . सदर कारवाई पो.नि. भगवान निंबाळकर , स.पो.नि. यमगर , पोहेकॉ / १२४२ बनसोडे , पोना / १६८२ मोहोळकर , पोकॉ / ६ ९ ० काळेल , पोकॉ / २२०६ चोरमुले व पोकॉ / १ ९ ७४ देशमुख यांनी केलेली आहे . पुन्हा सर्व नागरिकांना अहवान आहे की , जर शासनाचे नियम पाळले नाहीत तर मास्क वापरले नाहीत , दंड आकारला जाईल . विनाकारण फिरणा - यांची वाहने जप्त करण्यात येतील , निर्धारिम वेळे पेक्षा जस्त वेळ दुकान , परमिटरूम , बिअर बार उघडे ठेवल्यास सील केले जातील , लग्न सोहळयात २५ पेक्षा जास्त लोक आढळल्यास त्यांच्यावर गुन्हा दाखल केला जाईल , अटक केले जाईल व मंगल कार्यालयावर ५०,000 / -5 . दंड आकारला जाईल , अशा प्रकारे सांगोला पोलीस ठाणे कडक कारवाई करील , सोडणार
0 Comments