google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला ग्रामीण रुग्णालय व मेडशिंगी प्राथमिक आरोग्य केंद्र येथील कोव्हीड हॉस्पिटल उभारणीचे काम युद्धपातळीवर सुरू आमदार शहाजीबापू पाटील यांनी मंजूर केला एक कोटीचा निधी

Breaking News

सांगोला ग्रामीण रुग्णालय व मेडशिंगी प्राथमिक आरोग्य केंद्र येथील कोव्हीड हॉस्पिटल उभारणीचे काम युद्धपातळीवर सुरू आमदार शहाजीबापू पाटील यांनी मंजूर केला एक कोटीचा निधी

 सांगोला  ( प्रतिनिधी ) - सांगोला तालुक्यांमध्ये कोव्हीडचे रुग्ण वाढत असल्याने दिनांक २३ एप्रिल २०२१ रोजी सांगोला पंचायत समिती येथे सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री मा दत्तात्रय भरणे साहेब यांच्या बैठकीम ध्ये सांगोला ग्रामीण रुग्णालय सांगोला येथे


५० बेड व मेडशिंगी आरोग्य केंद्र येथे ५० बेडचे सुसज्ज व सर्व सोयीयुक्त कोव्हीड हॉस्पिटल सांगोला तालुक्यातील गरीब जनतेसाठी उभा करण्याचे ठरल्याप्रमाणे सांगोला ग्रामीण रुग्णालय येथे ५० बेडचे व प्राथमिक आरोग्यकेंद्र मेडशिंगी येथे ५० बेडचे सुसज्ज सर्व सोयीयुक्त कोव्हीड हॉस्पिटल उभारणीचे काम युद्ध पातळी वरती चालू आहे . या कोव्हीड हॉस्पिटल साठी सांगोला विधानसभा मतदार संघांचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी आपल्या आमदार निधीतून १ कोटी रुपयाचा निधी मंजूर केला आहे . या कामाची पहाणी सांगोल्याचे तहसीलदार अभिजीत पाटील , गट विकास अधिकारी संतोष राऊत , सार्वजनिक बांधकाम उपअभियंता श्री मुलगीर , यांच्यासह सांगोला नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष रफिक नदाफ यांनी पाहणी केली या कोव्हीड हॉस्पिटल मुळे गोरगरीब जनतेला वेळेत विनामूल्य उपचार मिळणार आहेत येत्या काही दिवसात हे हॉस्पिटल तालुक्यातील लोकांसाठी विनामुल्य उपचारासाठी सुरु होणार आहे 

Post a Comment

0 Comments