सांगोला ( प्रतिनिधी ) : - सांगोला शहरात येणाऱ्या प्रमुख ७ रस्त्यांवर चेकपॉईंट तयार झाले असून या ७ ठिकाणी नगरपालिका , महसूल , पोलीस यांचे संयुक्त पथकाव्दारे येणाऱ्या नागरिकांची चौकशी केली जाणार आहे . विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांना प्रवेश नाकारला जाणार आहे .
सांगोल्यात मोठी बाजारपेठ असल्याने तालुक्यातील व शेजारच्या तालुक्यातील ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणावर शहरात नागरिकांची ये - जा सुरु असते . मंगळवेढा - पंढरपूर भागात कोरोनाचा मोठा उद्रेक झाल्यामुळे त्या भागातील नागरिकसुध्दा शहरात येत असतात . अशावेळी नागरिकांची कोरोना चाचणी केल्याने शहरातील संभाव्य कोरोनाचा प्रसार कमी होण्यास मदत होणार आहे . तसेच पुढील टप्प्यात काही दिवसात येणाऱ्या प्रत्येक नागरिकांची कोरोना चाचणी ( रॅपिड | अॅन्टीजन टेस्ट ) करण्याचे प्रशासनाचे नियोजन असल्याची | माहिती मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी दिली . शहरामध्ये सकाळी ७ ते ११ या दरम्यान सुरु असणान्या अत्यावश्यक सुविधेच्यावेळी विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांची गर्दी कमी व्हावी यासाठी फिरत्या पथकाव्दारे कोरोना चाचणी केली जाणार असल्याचेही नगरपरिषदेचे मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी सांगितले .
0 Comments