google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 विज्ञान महाविद्यालय, सांगोला मधील भौतिकशास्त्र विभाग आणि आयक्यूएसी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेले दोन दिवसाचे आंतरराष्ट्रीय चर्चासत्र संपन्न झाले.

Breaking News

विज्ञान महाविद्यालय, सांगोला मधील भौतिकशास्त्र विभाग आणि आयक्यूएसी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेले दोन दिवसाचे आंतरराष्ट्रीय चर्चासत्र संपन्न झाले.

 *विज्ञान महाविद्यालयामध्ये आंतरराष्ट्रीय चर्चासत्र संपन्न* 


सांगोला: विज्ञान महाविद्यालय, सांगोला मधील भौतिकशास्त्र विभाग आणि आयक्यूएसी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेले दोन दिवसाचे आंतरराष्ट्रीय चर्चासत्र संपन्न झाले. सदरच्या चर्चासत्राच्या उदघाटन सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून *प्रा. (डॉ.) पी. एस. पाटील, प्र. कुलगुरु, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर* हे उपस्थित होते  तर प्रमुख व्यक्ते म्हणून *प्रा. (डॉ.) एफ. जे. स्टाडलार, शेन झेन विद्यापीठ, चीन* हे लाभले.


दुसऱ्या दिवशी च्या व्याख्यानासाठी प्रमुख व्यक्ते म्हणून *प्रा. (डॉ.) मासीमिलानी गल्लुझ्झी, शेन झेन विद्यापीठ, चीन* हे सहभागी झाले. प्रा. गल्लुझ्झी यांनी सांगितले की अटामिक फोर्स मायक्रोस्कोपी या तंत्राचा वापर करून नॅनो तंत्रज्ञानामध्ये वापरल्या जाणाऱ्या पदार्थाचे गुणधर्म अभ्यासू शकतो, तसेच अटामिक फोर्स मायक्रोस्कोपी हे तंत्रज्ञान पदार्थाच्या पृष्ठभागावरील गुणदोष दाखवतो. व्याख्यानाच्या या सत्रसाठी चेअरमन म्हणून *प्रा. (डॉ.) आर आर कोठावळे, शिवाजी महाविद्यालय, बार्शी* यांनी काम पाहिले तर सत्र प्रमुख म्हणून *प्रा (डॉ.) धसाडे सर* होते. संशोधकांच्या पेपर आणि पोश्टर सादरीकरणाच्या सत्र साठी चेअरमन म्हणून *डॉ. स्वाती पाटील, प्रतापसिंह पाटील महाविद्यालय, करमाळा* यांनी काम पाहिले.

चर्चा सत्र च्या समारोह सोहळ्या सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून *प्रा. आर टी सपकाळ, उप प्राचार्य, टी सी महाविद्यालय, बारामती* हे लाभले. प्रा. सपकाळ यांनी आपल्या भोवती असणारे ज्वलंत विषय, अन्न सुरक्षा आणि संरक्षण, हवामान बदल, तंत्रज्ञानाचा शेतीमध्ये उपयोग ई. विषयावर मार्गदर्शन केले. उद्योगधंदे बंद न करता त्यामध्ये वाढ झाली पाहिजे मात्र प्रदूषण विरहित वातावरणा साठी तंत्रज्ञानाचा उपयोग केला पाहिजे, तसेच राष्ट्रीय शिक्षण धोरणाचे बदलते स्वरूप लक्ष्यात घेवून "थिंक ग्लोबली, अॅक्ट लोकली" या प्रमाणे संशोधन केले तर बऱ्याचशा अडचणी कमी होऊ शकतील असे मत व्यक्त केले.

समारोह सोहळ्या प्रसंगी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना महाविद्यालयाचे *प्राचार्य डॉ. साहेबराव जुंदळे* यांनी महाविद्यालय, सांगोला तालुका, सांगोला तालुक्यातील शेती, शेतकरी, जनावरे, डाळिंब, सूतगिरणी आणि सांगोला तालुक्याचे माजी आमदार डॉ. गणपतराव जी देशमुख यांचे वेगळेपण सहभागीना सांगितले तसेच या तालुक्यातील नावाजलेल्या साहित्यिकांची आठवण करून दिली. डॉ. जुंदळे यांनी सांगितले की, चर्चासत्र मध्ये आयोजित केलेल्या व्याखणामुळे संशोधन कार्यात नव्याने येवू इच्छिणाऱ्या संशोधक विद्यार्थ्यांना एक प्रेरणा मिळेल तसेच हे महाविद्यालयाने आयोजित केलेले पहिलेच आंतरराष्ट्रीय चर्चासत्र असून भविष्यात अशा चर्चासत्र चे  नियोजन केले जाईल असे सांगितले. समारोह सोहळ्या प्रसंगी आंतरराष्ट्रीय चर्चासत्र चा घोषवरा चर्चासत्र चे समन्वयक डॉ ठोंबरे सर यांनी सर्वांसमोर मांडले. चर्चासत्र चे आभार भौतिकशास्त्र विभागाचे विभागप्रमुख प्रा. नवले सर यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. कांबळे सर यांनी केले. सदरचे  चर्चासत्र  व्यवस्थित पार पाडले बद्दल संस्था अध्यक्ष आदरणीय *डॉ. गणपतरावजी देशमुख साहेब* यांनी महाविद्यालयाचे कौतुक केले.

Post a Comment

0 Comments