विज्ञान महाविद्यालयात महात्मा फुले यांना अभिवादन विज्ञान महाविद्यालय सांगोला येथे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती निमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले कार्यक्रमाच्या सुरुवातीला महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेस प्रा डॉ साहेबराव जूदळे व प्रा दीपक रिटे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला अध्यक्षस्थानी प्रा डॉ साहेब राव जुदळे होते यावेळी आपले अध्यक्ष मनोगत व्यक्त करीत असताना ते म्हणाले की निरक्षर व अज्ञाना मध्ये असलेल्या समाजाला जागृत करण्याचे कार्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी केले हे सामाजिक कार्य करीत असताना त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले तरीही त्यांनी त्या वरती मात केली व दीनदलित दुबळ्या साठी काम करीतच राहिले पुढे त्यांनी महात्मा फुले यांचे जीवन चरित्र स्पष्ट करून जयंती करण्यात पाठीमागची भूमिका स्पष्ट केली
प्रा. दीपक रिटे आपले मनोगत व्यक्त करताना स्पष्ट केले की महात्मा फुले यांनी शोषित पीडित यांना शिक्षणासाठी प्रवृत्त केले त्यांच्या शिक्षणासाठी प्रयत्न केले व आज जो शिकलेला तरुण वर्ग आहे तो महात्मा फुले यांच्या विचारांमुळे व कार्यामुळेच आहे तेव्हा महात्मा फुले हेच आपल्या डोळ्यासमोर आदर्श ठेवून जीवन जगले पाहिजे असा आशावाद त्यांनी व्यक्त केला
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा डॉ दिपक शेटे यांनी केले तर आभार शुद्धोधन कदम यांनी मानले कार्यक्रमाला शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी सौ विमल ताई माने दत्तात्रेय भजनावळे बापू माने यांनी विशेष परिश्रम घेतले कार्यक्रम सोशल डिस्टंसिंग ठेवून पार पाडण्यात आला
0 Comments