सोलापूर : विरोधकांनी शेतकरी , 12 बलुतेदार , उद्योजक , हातावरील पोट असलेल्यांसाठी सरकारने विशेष पॅकेज जाहीर करून लॉकडाउन करण्याची मागणी लावून धरली आहे . या पार्श्वभूमीवर आता ठाकरे सरकार काय सवलत अथवा अर्थसहाय करणार , याची उत्सुकता आहे .
दरम्यान , लॉकडाउन हा अचानक केला जाणार नसून त्याची नागरिकांना काही दिवस अगोदर पूर्व कल्पना दिली जाणार आहे . त्यामुळे कोणीही बसस्थानक , रेल्वे स्थानकांसह अन्य ठिकाणी गर्दी करू नये , असे आवाहनही करण्यात आले आहे . राज्यात कोरोनाचा विळखा घट्ट होऊ लागला असून आरोग्य यंत्रणेवरील ताण वाढला आहे . रुग्णवाढीच्या तुलनेत मृत्यूदर वाढू लागला आहे . 1 ते 10 एप्रिल या काळात राज्यात तब्बल चार लाख 88 हजार रुग्ण वाढले असून पावणेतीन हजार रुग्णांचा मृत्यू झाला आहे . या पार्श्वभूमीवर 17 एप्रिलच्या मध्यरात्रीपासून 30 एप्रिलपर्यंत लॉकडाउन होऊ शकतो , अशी माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली . मात्र , मुख्यमंत्री उध्दव ठाकरे एक - दोन दिवसांत अधिकृत घोषणा करणार आहेत . तत्पूर्वी , नागरिकांना जिवनावश्यक वस्तू खरेदीसाठी व परराज्यातील व राज्यातील विविध जिल्ह्यांमधील जे कामगार इतरत्र आहेत , त्यांना त्यांच्या घरी जाण्यासाठी वेळ जाणार आहे .
0 Comments