सांगोला / प्रतिनिधी : सांगोला शहर व तालुक्यातील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व कोराणाच्या रूग्णांवर वेळेवर उपचार व सुविधा मिळाव्यात यासाठी सांगोला शहरातील ५ हॉस्पिटल अधिग्रहण करण्याचेआदेश जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांनी दिले
असून यामध्ये सांगोला शहरातील आनंद हॉस्पिटलचाही समावेश करण्यात आला आहे . त्यानुसार आनंद हॉस्पिटलमध्ये कोव्हिड रूग्णांना अॅडमिट त्यांच्यावर उपचार करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे . कोव्हिड रूग्णांना सेवा देण्यासाठी १५ खाटांची ऑक्सिजनसह सुसज्ज व्यवस्था करण्यात आली आहे . तसेच या हॉस्पिटलमध्ये कोव्हिड व नॉनकोव्हिड असे दोन विभाग वेगवेगळे करून दोन्ही प्रकारच्या रूग्णांना वैद्यकीय सेवा पुरवण्यात येणार आहे . तसेच कोव्हिड बाधित रूग्णांना ऑपरेशन गरज असल्यास त्यांच्या ऑपरेशनचीही सोय करण्यात आली आहे . गरजु रूग्णांनी आनंद हॉस्पिटल , भोपळे रोड , सांगोला ( ७७४१८०७ ९ ५७ , ७५८८५०६१ ९ ७ ) येथे संपर्क साधावा असे आवाहन डॉ.अमर शेंडे व डॉ.परेश खंडागळे यांनी केले आहे .
0 Comments