रावसाहेब,महसूल कर्मचारी झाले " चोरांवर मोर " ; शासकीय गोदामातील वाहनांच्या साहित्य चोरीत कर्मचाऱ्यांचा सहभाग ?
सांगोला येथील शासकीय धान्य गोडाऊन मध्ये ,अवैध वाळू वाहतूक करताना पकडलेली शेकडो वहाने लावलेली आहेत. या वहानांची देखरेख करण्यासाठी तहसीलदार साहेब यांनी महसूल कर्मचाऱ्यांची नियुक्ती झाली आहे. परंतु महसूल कर्मचारी काही चोरांशी संगणमत करून या पकडलेल्या वेगवेगळ्या वहानांचा साहित्याची टायर, बॅटरी, स्टाटर ,डिक्स, बैलगाड्या, मोटरसायकली, ईत्यादी . गेल्या काही महिन्यापासून मोठ्या प्रमाणात चोरीच्या घटना घडल्या आहेत. या सर्व प्रकाराकडे तहसीलदार किंवा कोणत्याही वरिष्ठ अधिकारी यांचे लक्ष नसल्याचे या वारंवार घडणाऱ्या चोरीच्या घटनेवरून दिसून येत आहे.या सर्व प्रकारामुळे महसूल विभागाचा गलथान कारभार चव्हाट्यावर आला आहे. शासकीय गोडावून मध्ये नेमणुका असणाऱ्या महसूल कर्मचाऱ्यांना कोणत्या तरी अधिका-यांचे अभय असल्या शिवाय हे कर्मचारी अश्या प्रकारचे धाडस करणार नाहीत.अशी चर्चा नागरिकांमधुन होताना दिसत आहे. त्यामुळे वरिष्ठ अधिकारी वहानांच्या साहित्य चोरीच्या या प्रकरणात केव्हा लक्ष घालून या चोरीच्या प्रकरणात सहभागी असणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कोणती कारवाई करतात हे पहाणे म्हत्वाचे आहे
0 Comments