google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0
या सर्व खातेदारांना केंद्र व राज्य शासनाचे वतीने मिळणारी पेन्शन तहसील कार्यालयाकडून सोलापुर डीसीसी बँकेतील या खातेदारांना पाठवली जाते. परंतु बॅंकेचे कर्मचारी वेळेत ही रक्कम खातेदारांच्या खात्यावर जमा करत नसल्याने अनेक आबालवृद्ध पुरुष महिला निराधार महिला अपंग यांना याचा मनस्ताप सहन करावा लागतो.
१ मार्च ते ३० मार्च या कालावधीत बहुतेक लाभार्थ्यांनी आपल्या हयाती बाबत ची सर्व कागदपत्रे सांगोला तहसील कार्यालयातील ' संजय गांधी निराधार योजना " या विभागात जमा केलेली आहेत. सदरची कागदपत्रे जमा केल्यानंतरच तहसील कार्यालयातील संजय गांधी निराधार योजना विभागांमधील या लाभार्थीच्या खात्यावर पेन्शन जमा करण्यात आली आहे.
परंतु सांगोला शहरातील डीसीसी बँक मार्केट यार्ड शाखे चे कर्मचारी हे बँकेतून पैसे काढण्यासाठी आलेल्या या निराधार, वृद्ध, अपंग नागरिकांना तहसील कार्यालयाकडे सादर केलेल्या कागदपत्रांची पोचपावती मागत आहेत. पोचपावती असेल तरच त्या खातेदाराला पैसे दिले जात आहेत. जो खातेदार तहसील कार्यालयाकडे हयातीची कागदपत्रे सादर केलेली पोचपावती देत नाहीत.
त्यांना सदर बँकेचे कर्मचारी पोच आणल्याशिवाय पैसे मिळणार नाहीत अशा प्रकारची सूचना करुन बँकेतून या खातेदाराला परत पाठवून देत आहेत. वास्तविक पाहता तहसील कार्यालयातील संजय गांधी निराधार योजना विभागांमधून हयातीचे दाखले तपासूनच या खातेदारांच्या खात्यावर पेन्शन जमा करण्यात आलेली आहे.
त्यामुळे बँक कर्मचाऱ्याने या खातेदारांना तहसील कार्यालयाकडे सादर केलेला कागदपत्राची पोचपावती मागणी करणे अनिवार्य नाही. किंवा तसा आदेश ही नाही.परंतु सदर बँकेतील कर्मचारी जाणीवपूर्वक कोरोना संकट काळातही या खातेदारांना पायपीट करण्यास भाग पाडत आहेत. त्यामुळे सदर बँकेच्या कर्मचाऱ्यांना वरिष्ठ अधिकारी यांनी सक्त ताकीद देण्याची मागणी निराधार अपंग वृद्ध नागरिकांमधून होताना दिसत आहे
0 Comments