दुय्यम निबंधक कार्यालयाच्या कारभाराला चाफ बसणार ; आता दस्त नोंदणीसाठी नवीन नियम लागू !
महाराष्ट्रातील कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी राज्यात ३० एप्रिल प्रयत्न संचारबंदी लागू करण्यात आली आहे.मात्र,या संचारबंदीच्या काळात महाराष्ट्र राज्यातील सर्व दुय्यम निबंधक कार्यालये सुरू राहणार आहेत. परंतु दस्त नोंदणी करण्यासाठी ऑनलाइन आगाऊ वेळ आरक्षित करणे बंधनकारक करण्यात आले आहे. कोरोना विषयक सुरक्षेचे सर्व नियम पाळूनच दस्त नोंदणी करण्याच्या सूचना नोंदणी महानिरीक्षक यांच्या कडून देण्यात आलेल्या आहेत.त्यामुळे आता नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाच्या संकेतस्थळावर ऑनलाइन भाडेकरार ( लिव्ह अँण्ड लायसन्स ई - रजिस्ट्रेशन ) करण्याची सुविधा उपलब्ध असल्याने ऑनलाइन भाडेकरारांच्या दस्ताची नोंदणी दुय्यम निबंधक कार्यालयात प्रत्यक्ष येऊन होणार नाही . 'दरम्यान , सर्व दुय्यम निबंधक कार्यालयांच्या कामकाजाची वेळ नियमित सत्रात म्हणजेच सकाळी ९:४५ ते सायंकाळी ६:१५ या वेळेत सुरू राहणार आहे.नागरिकांनी स्वत : चे पेन आणावे, एकच पेन २ किंवा इतर नागरिकांनी वापरू नये,मास्क लावल्याशिवाय कोणत्याही व्यक्तीला कार्यालयात प्रवेश दिला जाणार नाही.नागरिकांनी नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाच्या संकेतस्थळावर दस्त नोंदणीसाठी पब्लिक डाटा एण्ट्रीद्वारे ( पीडीई ) डाटा एण्ट्री करणे अनिवार्य करण्यात आले आहे . यापुढे दुय्यम निबंध कार्यालयातील डाटा एण्ट्री किंवा दुरुस्त्या पूर्णपणे थांबवण्यात आल्या आहेत.नागरिकांनी पीडीई डाटा एण्ट्री करून,दस्त नोंदणीसाठी विभागाच्या संकेतस्थळावरील ' ई - स्टेपइन ' या प्रणालीद्वारे दुय्यम निबंधक कार्यालयातील उपलब्ध असलेली सोयीची वेळ आरक्षित करून किंवा कार्यालयीन दूरध्वनीवर समक्ष संपर्क साधून वेळ आरक्षित करणे अनिवार्य आहे .


0 Comments