google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला तालुक्यातील राजुरी येथे लागल्या आगीत संसारपयोगी सामाना सोबत दोन शेळ्या जळून खाक.

Breaking News

सांगोला तालुक्यातील राजुरी येथे लागल्या आगीत संसारपयोगी सामाना सोबत दोन शेळ्या जळून खाक.

 सांगोला तालुक्यातील राजुरी येथे लागल्या आगीत संसारपयोगी सामाना सोबत दोन शेळ्या जळून खाक.


 सांगोल तालुक्यातील राजुरी येथील हरी रंगनाथ बंडगर यांच्या घराला आज दुपारी अचानक लागलेल्या आगीत त्यांचे संसारोपयोगी सामान पूर्ण जळून खाक झाले. यावेळी दोन गाभण शेळ्या या आगीमध्ये जळून मृत्युमुखी पडल्या व एक शेळी जखमी झाली दोन पोती गहु, दोन पोती ज्वारी व दोन पोती भरडा व रोख रक्कम 70 हजार रुपये व इतर जीवनावश्यक वस्तू या आगीमध्ये जळून खाक झाल्या.या आगीत शेळी वगळता कोणतीही जीवित हानी झाली नाही एकूण अंदाजे तीन ते सव्वा तीन लाखाचे नुकसान झाले आहे.

 राजुरी गावच्या तलाठी मॅडम गायकवाड, वाटंबरे पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर फुले, पोलीस पाटील विजय वाघमारे व राजूरी गावचे सरपंच यांच्या उपस्थित पंचनामा केला गेला.

Post a Comment

0 Comments