google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 शहरातील किराणा दुकान, भाजीपाला, दूध हे उद्यापासून सकाळी 7 ते 1 या वेळेतच चालू राहतीलमहानगरपालिकेचे आयुक्त पी. शिवशंकर

Breaking News

शहरातील किराणा दुकान, भाजीपाला, दूध हे उद्यापासून सकाळी 7 ते 1 या वेळेतच चालू राहतीलमहानगरपालिकेचे आयुक्त पी. शिवशंकर

 आयुक्त पी. शिवशंकर यांनी काढले सुधारित आदेश

सोलापूर,: सोलापूर शहरात दिवसेंदिवस रुग्ण संख्या वाढतच आहे. मृतांची संख्या वाढत आहे. स्मशान भूमीत अंत्यसंस्कारासाठी जागा अपुरी पडत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी वाढत्या रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर राज्यात 14 एप्रिल रात्री 8 पासून लॉकडाऊन जाहीर केला आहे.


30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन आहे.अत्यावश्यक सेवा सोडून सर्व व्यवहार बंद ठेवण्याचे आदेश सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त पी. शिवशंकर यांनी काढले होते. परंतु केवळ अत्यावश्यक सेवाच चालू असून देखील नागरिक मोठ्या प्रमाणात बाहेर पडताना दिसत आहे.त्यामुळे वाढणाऱ्या रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर शहरातील किराणा दुकान, भाजीपाला, दूध हे उद्यापासून सकाळी 7 ते 1 या वेळेतच चालू राहतील असे सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त पी. शंकर यांनी सोलापूर आकाशवाणीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे. वैद्यकीय अत्यावश्यक सेवा वगळून सर्वांना या वेळेतच दुकाने व्यवहार चालू ठेवता येतील.अत्यावश्यक असेल तरच नागरिकांनी बाहेर पडावे अन्यथा घरीच सुरक्षित रहावे असे आवाहन आयुक्त पी. शिवशंकर यांनी केले आहे.E-पास | पार्सल देणाऱ्या व्यक्ती, हॉटेल, ई-कॉमर्स ; इथे करा ऑनलाइन अर्ज राज्य शासनाच्या आदेशानुसार कोविड19 साठी देण्यात आलेल्या आदेशानुसार होम डिलिव्हरी करणारी व्यक्ती अथवा हॉटेल, ई-कॉमर्स इतर लोकांना ये-जा करण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून ई-पास देण्यात येणार आहेत. त्यासाठी उद्यापासून महापालिकेच्या वेबसाईटवरती हॉटेल, ई-कॉमर्स, यांच्या आस्थापना विभागाच्या संबंधितांनी ऑनलाइन अर्ज करावे.त्याची अंमलबजावणी सोमवार पासून करण्यात येणार आहे. असे सोलापूर महानगरपालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी काढलेल्या आदेशात नमूद केले आहे.अर्ज करत असताना त्या व्यक्तीचा फोटो, आधार कार्ड व rt-pcr चाचणी केलेली निगेटिव्ह सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे. रजिस्टर झाल्यानंतर आपल्या अर्जाची तपासणी केल्यानंतर 1 तासात पास देण्यात येईल. ई-पास करिता कुठेही जाण्याची गरज नाही त्यांनी फक्त महापालिकेच्या वेबसाईटवर ऑनलाइन रजिस्ट्रेशन करणे गरजेचे आहे. असे आयुक्त पी. शिवशंकर यांनी काढलेल्या आदेशात नमूद केले आहे.ज्यांच्याकडे ई. पास आहे त्यांनाच फिरत येईल. ई-पास ज्यांच्याकडे नाही त्याच्यावरती कारवाई करण्यात येईल अशी माहिती आयुक्त पी.शिवशंकर यांनी दिली आहे.

Post a Comment

0 Comments