google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सोलापूर जिल्ह्यात उद्या आणखी कडक निर्बंध येण्याची शक्यता?

Breaking News

सोलापूर जिल्ह्यात उद्या आणखी कडक निर्बंध येण्याची शक्यता?

 सोलापूर जिल्ह्यात उद्या आणखी कडक निर्बंध येण्याची शक्यता?


सोलापूर जिल्ह्यात वाढती कोरोणा रुग्ण संख्या लक्षात घेता उद्या आणखी कडक निर्बंध लागण्याची दाट शक्यता निर्माण झाली, असून आज पंढरपूर पोट निवडणुकीचे मतदान पार पडले आहे. यानंतर जिल्ह्यात पुन्हा एकदा कडक नियम लागू केले जाऊ शकतात.यालाच दुजोरा म्हणून की काय सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीमध्ये उद्या दि. १८ एप्रिल रोजी सोलापूर येथे कोरोना आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे पोट निवडणुकीमुळे आचारसंहिता असल्याने ही बैठक होऊ शकली नव्हती.या बैठकीला सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी त्याचबरोबर जिल्हा आरोग्य अधिकारी सोलापूर, जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक, पोलीस आयुक्त, महानगरपालिका आयुक्त यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. पालकमंत्री यांच्या उपस्थितीत सकाळी 11 वाजता नियोजन भवन सोलापूर येथे या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.सोलापूर शहर व जिल्ह्यामध्ये कोरोणा रुग्ण मोठ्या संख्येने वाढत आहेत. त्याचबरोबर जिल्ह्यामध्ये ऑक्सिजनची कमतरता, रुग्णालयांमध्ये बेड उपलब्ध नाही, मृत्यु दर वाढणे, कोरोणा बाबतीत असणारी इंजेक्शनचा तुटवडा आदी गोष्टी मोठ्या प्रमाणात घडत आहेत. याच अनुषंगाने उद्याची बैठक असून यामध्ये शहर व जिल्ह्यासाठी कडक नियम लागू होण्याची शक्यता आहे.

Post a Comment

0 Comments