google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सोलापुरकरांनो! जीवनावश्‍यक वस्तूंच्या दुकानांच्या वेळेत बदल; जाणून घ्या नवीन नियमावली

Breaking News

सोलापुरकरांनो! जीवनावश्‍यक वस्तूंच्या दुकानांच्या वेळेत बदल; जाणून घ्या नवीन नियमावली

 सोलापुरकरांनो! जीवनावश्‍यक वस्तूंच्या दुकानांच्या वेळेत बदल; जाणून घ्या नवीन नियमावली


सोलापूर महानगरपालिका हद्दीतील  लॉकडाउनमध्ये अत्यावश्‍यक सेवा व जीवनावश्‍यक दुकानांना सूट देण्यात आली होती. आता सर्व किराणा दुकाने, भाजीपाला दुकाने, फळांची दुकाने, डेअरी, बेकरी, मटण, चिकन, अंडी आणि मासे विक्रीची दुकाने व सर्व प्रकारच्या खाद्यपदार्थांची दुकाने तसेच पाळीव प्राण्यांच्या खाद्यपदार्थ विक्रीची दुकाने चालू ठेवण्याबाबत नवीन आदेश काढण्यात आले आहेत.नवीन आदेशानुसार महानगरपालिका हद्दीतील सर्व किराणा दुकाने, भाजीपाला दुकाने, फळांची दुकाने, डेअरी, बेकरी, मटण, चिकन, अंडी आणि मासे विक्रीची दुकाने व सर्व प्रकारच्या खाद्यपदार्थांची दुकाने तसेच पाळीव प्राण्यांच्या खाद्यपदार्थ विक्रीची दुकाने सकाळी सात ते दुपारी एक वाजेपर्यंत चालू राहतील, असे महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी सांगितले.जीवनावश्‍यक दुकानांच्या वेळेबाबत महानगरपालिका आयुक्तांनी नवीन नियमावली जारी केली आहे. त्यात म्हटले आहे की, प्रत्येक दुकानदाराने कोव्हिड मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करणे बंधनकारक राहील.शहरातील दुकानदारांनी रॅपिड अँटिजेन टेस्ट अथवा आरटीपीसीआर किंवा स्वतःचे लसीकरण केल्याबाबतची माहिती आपल्या दुकानात लावणे बंधनकारक असेल. दूध संकलनासाठी डेअरी सायंकाळी सहा ते सात या वेळेत सुरू राहतील.अत्यावश्‍यक सेवा पुरवणाऱ्या दुकानांच्या मालकांनी ग्राहकांना उभे राहण्याकरिता किमान एक मीटर अंतरावर गोल रिंगण आखणे आवश्‍यक राहील.सरकारने दिलेल्या निकषानुसार लवकरात लवकर लसीकरण करून घ्यावे. सर्व दुकानदारांनी कोव्हिडबाबत सुरक्षेचे सर्व उपाय जसे की पारदर्शकता काचेतून ग्राहकांशी संवाद साधणे किंवा फेस शिल्ड, इलेक्‍ट्रॉनिक पेमेंट आदींचा काटेकोरपणे वापर करावा. तसे न केल्यास महानगरपालिकेतर्फे कारवाई करण्यात येईल, असा इशारा आयुक्त पी. शिवशंकर यांनी दिला आहे

Post a Comment

0 Comments