google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांना गुप्त बातमी मिळाली की , बंडगरवाडी , चिकमहुद येथे लग्न चालु आहे.

Breaking News

सांगोला पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांना गुप्त बातमी मिळाली की , बंडगरवाडी , चिकमहुद येथे लग्न चालु आहे.

 सांगोला पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांना गुप्त बातमी मिळाली की , बंडगरवाडी , चिकमहुद येथे लग्न चालु आहे.सदर लग्नकार्यात १०० ते १५० लोक आहेत.तात्काळ त्या ठिकाणी पोलीस स्टेशनकडील स्टाफ पाठवुन नवरा - नवरी व व - हाडी मंडळी पोलीस स्टेशन ला बंद करण्यात आले . पोलीस स्टेशनला आणुप कारवाई केलेली नवरा नवरी व व - हाडी मंडळी यांची नावे .


१ ) शामराव सिदा बंडगर ( नवरदेवाचे वडील ) रा.चिकमहुद ता सांगोला २ ) सुनिता शामराव बंडगर ( नवरदेवाचे आई ) स.चिकमहुद ता सांगोला ३ ) राहुल शामराव बंडगर ( नवरदेव ) रा . चिकमहुद ता सांगोला ४ ) अर्जुन तातोबा अनुसे ( नवरीचे वडील ) रा.कटफळ ता सांगोला ५ ) उषा अर्जुन अनुसे ( नवरीची आई ) रा.कटफळ ता सांगोला ६ ) सोनाली अर्जुन अनुसे ( वथु ) रा.कटफळ ता सांगोला ७ ) धनाजी महादेव नारनवर रा.महिम ता सांगोला ८ ) बाळासाहेब मच्छिद्र बंडगर रा . चिकमहुद ता सांगोला९ ) बापु सिदा बंडगर रा.चिकमहुद ता सांगोला १० ) आण्णसाहेब रामचंद्र तांबवे रा.चिकमहुद ता सांगोला अशी आहेत . गुन्हा रजि .४१४ / २०२१ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला असुन सदर कार्यवाही पोलीस निरीक्षक , श्री भगवान निंबाळकर , पोसइ वसगडे , सपोफौ / संजय राऊत , पोहेकॉ / १६४० आप्पासो पवार , पोकॉ / ३३५ वाघमोडे पोना / २६४ क्षिरसागर , पोकॉ / १२३६ सावंत , गावकामगार पोलीस पाटील मौजे बंडगरवाडी , गावकामगार पोलीस पोटील मौजे महुद ब्रु यांनी कारवाई केलेली आहे . सांगोला तालुक्यातील नागरीकांना अवाहन करण्यात येते की , कोरोनाचे मोठे संकट आहे हया काळात नियमाचे पालन करा.कोणतीही दुकाने उघडु नका , विनाकारण बाहेर फिरू नका , लग्न हे २० ते २५ लोकांचेत करा.त्या सार्वची कोरोना लस घ्या तसेच कोरोना टेस्ट करा . शासनाने दिलेल्या नियमाचे पालन करा.विनाकारण पोलीस  ांना त्रास देवु नका . जर शासनाने दिलेल्या नियमाचे पालन केले नाही तर सांगोला पोलीस हे कधीही खपवुन घेणार नाही.विनाकारण फिरणा - यांच्या गाडया जप्त करत आहेत.दुकाने , मंगलकार्यालय सिल करून गुन्हे दाखल केले जात आहेत.दंडात्मक कारवाई केली जात आहे.तसेच सोलापुर जिल्हयाचे बाहेर व्यक्ती जावु नये किंवा बाहेरील व्यक्ती जिल्हयामध्ये येवु नये या साठी जिल्हा बॉर्डवर नाकाबंदी लावण्यात आलेली आहे.यापुढे कोणाचीही गय केली जाणार नाही त्यांचेवर कडक कारवाई करून गुन्हे दाखल करून अटक करून जेल मध्ये पाठवले जाणार आहे.तुमच्यामुळे तुमच्या व इतराच्या जीवीतास धोका निर्माण करत आहेत.त्यामुळे यापुढे कडक कारवाई केली जाणार आहे . ( भगवान निंबाळकर ) पोलीस निरीक्षक सांगोला पोलीस स्टेशन

Post a Comment

0 Comments