कोरोना काळात तिने मागितला मदतीचा हात आणि काही नालायकांनी दाखवली जात वैश्विक महामारी बनलेल्या कोरोना ने अनेक लोकांचे आप्तस्वकीय हिरावून घेतले आहेत. डोळ्या देखत रक्तातील लोकांचे प्राण जातांना पाहण्याची दुर्दैवी वेळ अनेकांवर ओढावली आहे.
काही लोकांनी आपत्ती च्या या घडीला माणुसकीचे दर्शन घडविले आहे तर काहींनी मात्र आपला नालायकपणा सिद्ध केला आहे. एका महिले सोबत घडलेला प्रकार महिलेने ‘ व्हॉइस वर्ल्ड न्यूज ‘ च्या माध्यमातून सांगितला आहे. या महिलेच्या कुटुंबातील एका सदस्याला कोरोनाची लागण झाली होती.त्यांना व्हेंटिलेटर ची आवश्यकता असल्याने कुटुंबीय व्हेंटिलेटर चा शोध घेत होते. यासाठी महिलेने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटर वर आपला नंबर शेअर करून संपर्क साधण्याची विनंती केली.त्यानंतर ६ तासाच्या आत तिला व्हेंटिलेटर उपलब्ध झाले. त्यांनतर महिलेला A+ रक्तगटाच्या प्लाझ्माची आवश्यकता भासली. सादर कुटुंब A+ प्लाझ्मा डोंगर चा शोध घेत होते ओण डोनर सापडत नव्हता. पहिल्या प्रयत्नात यश मिळल्यानें तिने पुन्हा सोशल मीडियाची मदत घेण्याचे ठरवले.काहीं लोकांनी वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म वर महिलेची व्यथा आणि तिचा नंबर शेअर केला.मदत तर दूर एका व्यक्तीच्या तिला फोन आला आणि तिला तुम्ही सिंगल आहेत काय ? अशी विचारणा करण्यात आली. महिलेला या गोष्टीचा राग आल्याने तिने कॉल कट केला. अनेक लोकांनी कॉल करून तिला त्रास देण्याचा प्रयत्न केला. दरम्यान तिला सात व्हिडीओ कॉल्स आले. यापैकी तीन लोकांनी तिला आपल्या प्रायव्हेट पार्ट चा फोटो पाठवला. अनेकांनी तिला अश्लील व्हिडीओ देखील पाठवले. या प्रकाराने त्रस्त महिलेने आपला नंबर आणि माहिती सोशल मीडियावरून हटवली. या प्रकारामुळे तिला भरपूर मानसिक तरस सोसावा लागला. असा प्रसंग जर आपल्यावर ओढावला तर काळजी घेण्याचा सल्ला अनेकांनी दिला आहे.
0 Comments